High Security Registration Plate: वाहनधारकांनी वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजे HSRP नंबर प्लेट बसविताना परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करायचा आहे. तर शुल्क भरायचे असल्यास http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच भरण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करण्यासाठी या नंबर प्लेट सक्तीच्या केल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्या शिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक आहे. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांनी वाहनांवर एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहनही भोसले यांनी केले आहे.
जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेटसाठी आता अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांनी आपल्या वाहनांना आतापर्यंत HSRP नंबर प्लेट लावली नाही त्यांना ती लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. या अंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी 30 जून 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. अशा स्थितीत आता ही अंतिम मुदत आणखी वाढवण्यात आली आहे.
नव्या मुदत वाढी नुसार आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाहनांना HSRP नंबर प्लेट लावता येणार आहेत. तसे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे. परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी पाटीसाठी वेळ घेणे आवश्यक आहे. वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या या वेबसाठीचा त्यासाठी वापर करावा. ही वेळ 15 ऑगस्ट 2025 पूर्वी घेतल्यास संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई होणार नाही, असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे.