
High Security Registration Plate:जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेटसाठी आता अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांनी आपल्या वाहनांना आतापर्यंत HSRP नंबर प्लेट लावली नाही त्यांना ती लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. या अंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी 30 जून 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. अशा स्थितीत आता ही अंतिम मुदत आणखी वाढवण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नव्या मुदत वाढी नुसार आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाहनांना HSRP नंबर प्लेट लावता येणार आहेत. तसे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे. परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी पाटीसाठी वेळ घेणे आवश्यक आहे. वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या या वेबसाठीचा त्यासाठी वापर करावा. ही वेळ 15 ऑगस्ट 2025 पूर्वी घेतल्यास संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई होणार नाही, असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे.
यानंतर देखील एचएसआरपी पाटी बसवलेली नसलेली वाहने वायुवेग पथकांच्या तपासणीदरम्यान आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. अशा स्थितीत ज्यांनी ही नंबर प्लेट लावली नाही त्यांनी ती लावाली. अन्यथा मोठा दंड त्यांना भरावा लागू शकतो.
वाहनधारकांनी मुदतीच्या आत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) ही भारत सरकारने वाहनांची सुरक्षा आणि ओळख वाढविण्यासाठी लागू केलेली एक अनिवार्य नंबर प्लेट आहे. HSRP ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, ज्यावर एक सिरीयल नंबर आणि त्यावर न काढता येणारा लॉक असतो. ही नंबर प्लेट चोरी, वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षेच्या कारणांसाठी महत्त्वाची आहे. भारतातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world