Tukaram Mundhe तुकाराम मुंढेंची बदली होणार? मंत्र्यांच्या एका उत्तराने सर्व चर्चांना पूर्णविराम; वाचा काय घडलं

Tukaram Mundhe News: आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा आता थेट राज्याच्या विधानसभेत रंगली आहे

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Tukaram Mundhe News: आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा आता थेट राज्याच्या विधानसभेत रंगली आहे. अवघ्या 25 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल 27 वेळा बदली झालेले तुकाराम मुंढे हे सध्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी या विभागाचा पदभार घेतल्यापासून राज्यभरात भेसळ करणाऱ्यांचे आणि नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हाच धडका पाहून आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच मुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्र्यांकडे एक अनोखी मागणी केली आहे. या कार्यक्षम अधिकाऱ्याची निवृत्त होईपर्यंत याच पदावर बदली करू नका, असा सूर थेट विधानसभेत उमटला आहे.

आमदारांची  विधानसभेत मोठी मागणी

शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. तुकाराम मुंढे ज्या दिवसापासून अन्न व औषध प्रशासनात आले आहेत, त्या दिवसापासून महाराष्ट्रात अवैध आणि बेकायदेशीर काम करणाऱ्यांची झोप उडाली आहे, असे पाटील म्हणाले. मुंढे यांच्या कडक कारवाईमुळे राज्यातील लहान मुलांपासून ते माता-भगिनींपर्यंत सर्वांचे आरोग्य सुरक्षित झाले आहे. 

Advertisement

त्यांना त्यांच्या स्वभावाला आणि कामाच्या पद्धतीला शोभेल असेच उत्तम खातं पहिल्यांदा मिळालं आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की तुकाराम मुंढे यांची अगदी निवृत्तीपर्यंत याच विभागात ठेवावं आणि त्यांची बदली करू नये. निवृत्ती नसेल तर किमान पुढील 3 वर्षे तरी महाराष्ट्र पूर्णपणे सुधारेपर्यंत त्यांची बदली होणार नाही, याचे आश्वासन सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

( नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडक मोहीम हायकोर्टात फेल, ऐतिहासिक गोरस भांडाराचा FDA विरुद्ध मोठा विजय )

राज्यभर कारवाईचा धडका

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे संचालक पद स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात हॉटेल चालक, विक्रेते आणि साठेबाजांवर जोरदार मोहीम उघडली आहे. अस्वच्छता, भेसळयुक्त अन्न आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्यांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. मुंढे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये त्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे.

( नक्की वाचा : जेवायला गेले अन् थेट नियमच बदलले! Tukaram Mundhe यांच्या एका अनुभवामुळे हॉटेल चालकांचे धाबे कसे दणाणले? )
 

मंत्री नरहरी झिरवाळ यांचे महत्त्वाचे उत्तर

आमदार किशोर पाटील यांच्या या मागणीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सकारात्मक आणि महत्त्वाचे उत्तर दिले. विधानसभेत बोलताना झिरवाळ म्हणाले की, तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा सध्या कोणताही विषय येत नाही. या विभागात सध्या अतिशय सुरळीत आणि उत्तम पद्धतीने कामकाज सुरू आहे आणि ते पुढेही असेच सुरळीत चालू राहील. मंत्र्यांच्या या उत्तरानंतर तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला असून, त्यांच्या धडाकेबाज कारवाईला सरकारचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.