आयआयटीमधील कॅम्पस मुलाखतींची विद्यार्थी आतूरतेने वाट पाहत असतात. येथील विद्यार्थ्यांना ऑफर होणाऱ्या पगाराची देशभर चर्चा होते. आयआयटी मुंबईमध्ये असंच काही घडलं आहे. IIT-B च्या प्लेसमेंटला रविवारपासून जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 45 हून अधिक कंपन्यांनी आयआयटी मुंबईतील कॅम्पसला भेट दिली. यामध्ये सर्वात जास्त ऑफर ट्रेडिंग फर्म 'दा विंची डेरिव्हेटिव्हज'कडून (Da Vinci Derivatives) आली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कंपनीने त्यांच्या ॲमस्टरडॅम ऑफिसमधील पदांसाठी 2.2 कोटी रुपयांचे पॅकेज ऑफर केले.
(नक्की वाचा: सरकार स्थापनेला उशीर, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फटका)
कंपनीने किमान तीन विद्यार्थ्यांना पोझिशन्स ऑफर केल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने आपल्या मुंबई आणि ॲमस्टरडॅम कार्यालयात किती पदांसाठी ऑफर दिल्या हे देखील स्पष्ट झाले नाही. हेज फंड फर्म जेन स्ट्रीटने देखील प्री-प्लेसमेंट ऑफर केली. या कंपनीने गेल्या वर्षी 3.7 कोटी रुपयांचे पॅकेज ऑफर केले होते. IMC ट्रेडिंगने आपल्या मुंबई कार्यालयातील पदांसाठी 1 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, यासाठी त्यांनी 10 विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केले.
Graviton, QuadEye आणि WorldQuant ने 90 लाखांपेक्षा जास्त पॅकेजसह देशांतर्गत पोझिशन्स ऑफर केल्या आहेत. QuadEye ने त्यांच्या हाँगकाँगमधील ऑफिससाठी नोकरीची ऑफर दिली आहे.
(नक्की वाचा - Shrinkat Shinde : उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया)
विद्यार्थ्यांनी सांगितले की, बहुतेक मोठ्या ट्रेडिंग कंपन्यांनी 1 कोटी किंवा त्याहून अधिकचे पॅकेज ऑफर केले. Nvidia, कन्सल्टन्सी पॉवरहाऊस मॅकिन्से आणि BCG, ब्लॅकस्टोन, सोनी जपान, पाइन ब्रिज आणि GE एरोस्पेस या कंपन्या देखील कॅम्पसमध्ये सामील झाल्या होत्या.
फ्लिपकार्ट, ऍपल, ओला, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने देशांतर्गत प्रोफाइल ऑफर केले. रात्री उशिरापर्यंत, Qualcomm ने 90 विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केले होते ज्यांची मुलाखत घेतली जाणार होती.