IKEA ची पु्ण्यात एन्ट्री; मोठी जागा भाड्याने घेतली; भाडं ऐकून थक्का व्हाल!

IKEA इंडिया शहरातील शोरूम्सची संख्या आणि व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. 'सीआरई मॅट्रिक्स' या रिअल इस्टेट डेटा प्लॅटफॉर्मनुसार, या जागेचा करार 15 ऑक्टोबर रोजी नोंदवण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

स्वीडनमधील होम फर्निचर रिटेल कंपनी आयकेईए इंडिया प्रा. लिमिटेडने (IKEA India) पुणे शहरात पहिले स्टोअर उघडण्याची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने पुण्यातील विमाननगर रोडवरील फोनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये 37,259 चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे.

IKEA इंडिया शहरातील शोरूम्सची संख्या आणि व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. 'सीआरई मॅट्रिक्स' या रिअल इस्टेट डेटा प्लॅटफॉर्मनुसार, या जागेचा करार 15 ऑक्टोबर रोजी नोंदवण्यात आला आहे. मिंटने याबाबतचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. 

कराराचा तपशील 

  • ठिकाण: फोनिक्स मार्केटसिटी मॉल, विमाननगर रोड, पुणे
  • क्षेत्रफळ: 37,259 चौरस फूट.
  • कालावधी: 5 वर्ष.
  • सुरुवातीचे मासिक भाडे: सुमारे 38 लाख रुपये.

(नक्की वाचा-  Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

IKEA चा भारतातील विस्तार

IKEA ने चेन्नई आणि पुणे शहरांत आपला विस्तार करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी ऑगस्टमध्ये कंपनीने नवी दिल्लीतील टॅगोर गार्डन येथील पॅसिफिक मॉलमध्ये 15,000 चौरस फुटांचे छोटे स्टोअर सुरू केले होते. 2013 मध्ये भारताच्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या (FDI) नियमांखाली स्टोअर्स उघडण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर IKEA ने भारतीय रिटेल बाजारपेठेत प्रवेश केला होता.

आयकेईएची सध्या हैदराबाद, नवी मुंबई आणि बेंगळुरू येथे मोठ्या स्वरूपाची स्टोअर्स आहेत. यासोबतच शहरांमध्ये लहान स्वरूपाची किंवा सिटी स्टोअर्स देखील कार्यरत आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरातसह अनेक बाजारपेठांमध्ये कंपनी ऑनलाईन डिलिव्हरी सुविधा पुरवते.

Advertisement
Topics mentioned in this article