ठाण्यातील 6 वर्षीय रेयांश खामकर याने पोहण्यामध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. विजयदुर्गच्या समुद्रात 15 किलोमीटरचं सागरी अंतर त्याने अवघ्या 3 तासात पोहून पार केलं आहे. त्याच्या या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. या नंतर रेयांशवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. ऐवढ्या लहान वयात त्याने केलेल्या कामगिरीचं कौतूक होत आहे. भविष्यात असेच विक्रम करण्याचा रेयांशचा या चिमुकल्याचा मानस आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विजयदुर्ग समुद्रात सागरी जलतरणाची राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी दरम्यान जलतरण करायचे होते. हे अंतर जवळपास 15 किलोमिटरचे आहे. या स्पर्धेत देशभरातून 30 जलतरणपटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ही स्पर्धा 8 वर्षांवरील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती. असं असतानाही रियांश केवळ 6 वर्षाचा असताना या स्पर्धेसाठी पात्र ठरला.
रियांश याची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेत त्याला या स्पर्धेत प्रवेश देण्यात आला होता. त्याच्या तुलनेत इतर स्पर्धक हे वायने मोठे होते. मात्र तरी ही तो या स्पर्धेत चिकाटीने उतरला होता. त्याने हे 15 किलोमिटरचं अंतर 3 तासात पोहून पूर्ण केलं. हा एक विक्रम ठरला आहे. त्यामुळेच त्याच्या या कामगिरीची दखल थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.
ट्रेंडिंग बातमी - Mumbai News: एकाच नंबरच्या दोन गाड्या ताज हॉटेलमध्ये आल्या, अन् पुढे जे घडलं ते...
रेयांशच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे असं त्याचे वडील दीपक खामकर यांनी सांगितलं. यासाठी तो नेहमीच मेहनत घेत होता. लहान वयात ही त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे त्याचे विशेष कौतूक आहे. भविष्यात त्याने ऑलिंपिकमध्ये देशासाठी ही मेडल जिंकावं, अशी इच्छा त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी तो आतापासूनच तयारी करत आहे. त्याची सुरूवात त्यांनी या स्पर्धेपासूनच केली आहे.