जाहिरात

Mumbai News: एकाच नंबरच्या दोन गाड्या ताज हॉटेलमध्ये आल्या, अन् पुढे जे घडलं ते...

26/11 च्या हल्लानंतर ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Mumbai News: एकाच नंबरच्या दोन गाड्या ताज हॉटेलमध्ये आल्या, अन् पुढे जे घडलं ते...
मुंबई:

मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये अशी एक घटना घडली ज्याने सर्वच जण चक्रावून गेले आहेत. इथे एकाच वेळी दोन कार हॉटेलच्या गेट मध्ये आल्या. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या एकाच नंबर प्लेटच्या होत्या. त्यांचा नंबर हा एकच होता. गाड्यांचे मॉडेलही सारखे होते. पण त्यातील एका गाडीच्या मालकाने ही बाब पाहीली त्यानंतर तो हादरून गेला. हॉटेल मॅनेजमेंटनेही तातडीने याची दखल घेतली. यातली खरी गाडी कोणती आणि खोटी कोणती याबाबत संभ्रम निर्माण झाला. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रत्येक गाडीला वेगवेगळे क्रमांक दिलेले असतात. त्यामुळे एकाच नंबरच्या दोन गाड्या रस्त्यावर धावू शकत नाहीत. तसे असेल तर नक्कीच काही तरी गडबड समजावी. अशीच एक घटना मुंबईच्या जात हॉटेलमध्ये निदर्शनास आली. एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या ताज हॉटेलच्या गेटमध्ये आल्या. त्यामुळे खरी खोटी कोणती असा प्रश्न निर्माण झाला. सुरक्षेचा विषय असल्याने तातडीने मुंबई पोलिसही ताज हॉटेलमध्ये पोहोचले. 

ट्रेंडिंग बातमी - HMPV Update : पुन्हा मास्क, पुन्हा सॅनिटायझर? भारतात HMPV चे 2 रुग्ण, आरोग्य विभागाने जारी केली नियमावली

 एका गाडीच्या मालकाने एकाच क्रमांचाच्या दोन गाड्या कशा यावर आक्षेप घेतला. त्यानुसार मुंबई पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. एका कार ड्रायव्हरने चलानपासून वाचण्यासाठी आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलली होती. योगायोगाने त्याने जो नंबर बदलला त्याच नंबरची गाडी ताज हॉटेलमध्ये आली. त्याच वेळी नंबर बदली केलेली गाडीही तिथे होती. पोलिसा आल्यानंतर या सर्व गोष्टी उजेडात आल्या. पोलिस आता याबाबत अधिक तपास करत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Sharad Pawar: शरद पवार यांचे CM देवेंद्र फडणवीस यांना पत्र! संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक दावा;

26/11 च्या हल्लानंतर ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक वाहनासह पाहुण्यांचीही  तपासणी केली जाते. कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाते. ताज हॉटेलच्या सतर्कते मुळे एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या असल्याची बाब समोर आली. शिवाय  पोलिसांना लगेचच कळवल्याने खरं आणि खोटं काय आहे याचा निकाल ही लागला.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com