Gold news: अबब! अक्षय्य तृतीयेला तब्बल 20,000 कोटींच्या सोन्याची विक्री

आज अक्षय्य तृतीयेला एकूण 20,000 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा राजेश रोकडे यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सोन्याच्या किंमती पडल्यामुळे अक्षय्य तृतीयेला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले गेले आहे. हे रेकॉर्ड ब्रेस सोने खरेदी बोलले जात आहे. सोन्याची किंमत प्रति तोळा 99,500 रुपयांवर पोहोचली होती. ती 95,000 रुपयांपर्यंत खाली आली. यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे.  यावर ग्राहकांचा ही विश्वास अधिक दृढ झाला आहे. आज, आम्हाला दोन प्रकारचे ग्राहक दिसत आहेत. पहिले,जे  50,000 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान खरेदी करत आहेत. जे सणासुदीच्या ऑफर्सला आकर्षित झाले आहेत, असं India gem and jewellery domestic council चे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुसरे, उच्च-मूल्याचे खरेदीदार जे 10 ते 15 लाख रुपयांची गुंतवणूक करत आहेत. जे शुभ मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी काही दिवस आधीपासून योजना आखून बुकिंग केलं होतं. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यामुळे आज अक्षय्य तृतीयेला एकूण 20,000 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा राजेश रोकडे यांनी केला आहे. याशिवाय, अक्षय्य तृतीयेदरम्यान लग्नसराई सुरू होत असल्याने, आगामी दिवसांमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती All India gem and jewellery domestic council चे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nashik News: सिनेस्टाईल थरार! पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळाला, 12 तासाच्या आता पुन्हा गजाआड झाला

याव्यतिरिक्त, रोकडे यांनी हलक्या वजनाच्या दागिन्यांच्या वाढत्या मागणीवर जोर दिला. हलक्या वजनाच्या डिझाइनकडे लक्षणीय बदल दिसून येत आहे, विशेषतः तरुण खरेदीदार आणि रोजच्या वापरासाठी या दागिन्यांना मागणी आहे. हे दागिने सोन्या सारखेच दिसतात. शिवाय ते किंमतीच्या दृष्टीने परवडणारे असल्याने, बदलत्या दरांमधील एक आकर्षक पर्याय बनताना दिसत असल्याचे ही रोकडे यांनी सांगितले. 

Advertisement