Pune News : पुण्यावर मोठं संकट? स्थानिकांसह प्रवाशांनी राहा अलर्ट, 'या' भागात नागरिकांची पळापळ; Video व्हायरल

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भिगवण पळसदेव भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Rain Video Viral
पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Pune Rain Video : पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भिगवण पळसदेव भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज 23 फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळी  इंदापूरच्या काही भागात वरुण राजाने हजेरी लावली. अचानक पाऊस कोसळल्याने अनेकांची धांदल उडाली. पावसाच्या जोरदार सरी कॅमेरात कैद झाल्या असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील इंदापूर तालुक्याला आज अवकाळी पावसाने चांगलच झोडपलं. सकाळपासून या परिसरात ढगाळ वातावरण असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. या भागातील रस्त्यावरून वाहतूक सुरळीत सुरु होती. परंतु, अचानक आलेल्या अवळाकी पावसामुळे प्रवाशांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

नक्की वाचा >> Holi Holiday 2026: होळीच्या सुट्ट्यांबाबत मोठी अपडेट, शाळेला सुट्टी कधी? 3 की 4 मार्च? पाहा संपूर्ण लिस्ट

इथे पाहा अवकाळी पावसाचा व्हिडीओ 

पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून नुकतीच वर्तवण्यात आली होती. तसच पाऊस पडल्यावर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं होतं.व्हिडीओत पाहू शकता की, हायवेवर अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे वाहतुकीवर कोणताही परीणाम झाला नसून वाहने हायवेवरून सुसाट प्रवास करत असल्याचं व्हिडीओत दिसतंय. 

Advertisement

तसच पावसाच्या सरींसोबतच वाराही वेगाने वाहत असल्याचं व्हिडीओत पाहू शकता. काही भागात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याचंही दिसतंय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवमान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. तसच काही भागात सोसाट्याचा वाराही सुटणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.तसच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला होता.