Indigo News: ​इंडिगोचा मोठा निर्णय! अनेक आंतरराष्ट्रीय विमाने तात्पुरती बंद, पाहा संपूर्ण यादी

इंडिगो (IndiGo) या आघाडीच्या विमान कंपनीने त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांमध्ये तात्पुरती कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Indigo Flights Cancelled List

Indigo Flights Cancelled :  इंडिगो (IndiGo) या आघाडीच्या विमान कंपनीने त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांमध्ये तात्पुरती कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जारी केलेल्या पत्रकानुसार,1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमान फेऱ्या कमी केल्या जातील.तर लंगकावी (मलेशिया),क्राबी (थायलंड), हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम),हाँगकाँग,शांघाय (चीन)आणि सिएम रीप (कंबोडिया) या देशांसाठीची विमान सेवा 3 जुलै ते 30 सप्टेंबर या काळात पूर्णपणे स्थगित म्हणजेच बंद राहणार आहे. 

1 ऑक्टोबरपासून बुकिंग पुन्हा सुरू होणार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,या मार्गांवरील तिकिटांचे बुकिंग 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू केले जाईल.तसेच,जर मार्केटची स्थिती आणि प्रवाशांची मागणी सुधारली,तर ही सेवा निर्धारित वेळेआधीच म्हणजेच 1 ऑक्टोबरपूर्वीही पुन्हा सुरू केली जाऊ शकते.दरम्यान,या बदलांनंतरही इंडिगोची दर आठवड्याला होणारी 1800 हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित सुरू राहतील.

Advertisement

नक्की वाचा >> Solapur News: सोलापूरच्या राजकारणात नवा ट्वीस्ट, NCP चे उमेदवार वसंत देशमुखांच्या एका भेटीमुळे चर्चांना उधाण

​विमान सेवा बंद करण्याचे कारण काय?

प्रवाशांची सध्याची मागणी,वाढता खर्च आणि हवाई क्षेत्रावरील (Airspace) निर्बंध लक्षात घेऊन क्षमतेचा समतोल राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे विमान कंपनीने स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे ज्या प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होणार आहे,त्यांना थेट माहिती दिली जाईल.तसेच प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांच्या विमानाची सद्यस्थिती (Flight Status) तपासून घ्यावी,असा सल्लाही कंपनीने दिला आहे. 

नक्की वाचा >> Pune News: इंचभरही जमीन देणार नाही, त्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, पुरंदरमध्ये शिवसृष्टी उभारण्याची मागणी