जाहिरात

Solapur News: सोलापूरच्या राजकारणात नवा ट्वीस्ट, NCP चे उमेदवार वसंत देशमुखांच्या एका भेटीमुळे चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार वसंत देशमुख यांनी सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असणाऱ्या प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग कारखान्याला भेट दिली.

Solapur News: सोलापूरच्या राजकारणात नवा ट्वीस्ट, NCP चे उमेदवार वसंत देशमुखांच्या एका भेटीमुळे चर्चांना उधाण
Solapur Vidhan Parishad Election 2026

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी 

Solapur Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार वसंत देशमुख यांनी सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असणाऱ्या प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग कारखान्याला भेट दिली. स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी वसंत देशमुख यांनी श्रीपूर येथे उपस्थिती दर्शवली.भाजपची उमेदवारी न मिळाल्यामुळे परिचारक समर्थक नाराज असताना वसंत देशमुख यांची पांडुरंग कारखान्याला दिलेली भेट राजकीय चर्चांना उधाण आणणारी आहे.

विधान परिषदेसाठी सोलापूरमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख यांची भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याशी लढत होत आहे. देशमुख वगळता सर्व उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.सोलापूर जिल्ह्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे विश्वासू म्हणून वसंत देशमुख यांची ओळख आहे.

भाजपकडून उमेदवारीसाठी 'ते' नाव होते आघाडीवर

परिचारकांच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर वसंत देशमुख काही काळ व्हाईस चेअरमन म्हणून देखील काम करत होते.पंढरपूरच्या राजकारणात देशमुखांची सुरुवात ही परिचारकांच्या सोबतीने झाली.त्यामुळे काही वर्षापासून परिचारक आणि देशमुख यांचे राजकीय संबंध आहेत.मध्यंतरीच्या काळात हे संबंध दुरावले होते.मात्र वसंत देशमुख यांची सुधाकर पंत परिचारकांप्रती असणारी श्रद्धा मात्र कायम असल्याचे  दिसून येते. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजेंद्र राऊत आणि प्रशांत परिचारक यांचे नाव भाजपकडून उमेदवारीसाठी आघाडीवर होते.

नक्की वाचा >> Pune News: इंचभरही जमीन देणार नाही, त्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, पुरंदरमध्ये शिवसृष्टी उभारण्याची मागणी

राऊत विरुद्ध देशमुख अशी लढत होणार

प्रशांत परिचारकांना उमेदवारी डावलण्यात आली.त्यानंतर परिचारक समर्थक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले.अशातच काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार झाले आहेत.आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या मुदतीनंतर राऊत विरुद्ध देशमुख अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर देशमुखांनी थेट श्रीपूरच्या कारखान्यावर सुधाकर पंत परिचारक यांच्या स्मारकाजवळ हजेरी लावली. त्यामुळे आपसूकच राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या गेल्या. 

नक्की वाचा >> Rajesh Exports Scam: 15 लाख कोटींचा घोटाळा, LIC ला सुद्धा कोट्यवधींचा फटका! 'गोल्ड किंग'ला SEBI ने केलं कंगाल

विधान परिषदेच्या 616 मतांपैकी सर्वाधिक मते माळशिरस तालुक्यात आहेत.परिचाराकांचा कारखाना असणाऱ्या श्रीपूर महाळून परिसरात देखील नगरसेवक आहेत.तसेच देशमुख मूळचे पंढरपूरचे असल्याने पंढरपूरमध्ये देखील 48 मतं आहेत.त्यामुळे मतांची गोळा बेरीज आणि जुन्या काळापासून वसंत देशमुख यांची मोहिते पाटील आणि सुधाकरपंत परिचाराकांवर असणारी निष्ठा याचा संयोग साधून निवडणुकीची रणनीती आखण्याची प्रयत्न देशमुखांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com