जाहिरात

Trending Video: प्रेमात धोका, होणाऱ्या नवऱ्याने घेतला बदला..सोशल मीडिया स्टार रोनिशाने उचललं टोकाचं पाऊल

जम्मूची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रोनिशाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिने होणाऱ्या नवऱ्यावर गंभीर आरोप केले.

Trending Video: प्रेमात धोका, होणाऱ्या नवऱ्याने घेतला बदला..सोशल मीडिया स्टार रोनिशाने उचललं टोकाचं पाऊल
Social Media Star Ronisha Viral News

Jammu Ronisha Satti Case News: जम्मूची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रोनिशाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिने होणाऱ्या नवऱ्यावर गंभीर आरोप केले. आक्षेपार्ह गोष्टी पसरवून तिच्या मान सन्मालाला ठेच पोहोचवण्याचा आरोप रोनिशाने तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर केला.एनडीटीव्हीशी बोलताना रोनिशाच्या आईने रडत रडत म्हटलं की, तिचा होणारा नवरा प्रशांतने तिच्या मुलीचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. प्रशांतने माझ्या मुलीकडून 10 लाख रूपये घेतले होते.नंतर त्याने लग्नाला नकार दिला.यामुळे रोशनीला मोठा धक्का बसला आणि तिने हे पाऊल उचललं.

प्रेम,धोका आणि ट्रोलिंगची स्टोरी

प्रेम,धोका आणि ट्रोलिंग..रोशनीच्या कहाणीत लव्ह ट्रँगल,सोशल मीडिया ट्रोलिंग आणि नात्यात धोक्याचं अँगलही समोर येत आहे. आई रीनाने म्हटलं,"तिच्या होणाऱ्या नवऱ्याने एक खोटं पेज बनवलं आणि त्याच्याबद्दल खूप आक्षेपार्ह लिहिलं. काही फोटोही अपलोड केले आणि खोटी माहिती पसरवून माझी मुलगी आणि संपूर्ण कुटुंबाची बदनामी केली. या कारणामुळे माझ्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आता ती आणखी त्रास सहन करू शकत नाही.त्यामुळे तिने इतकं मोठं पाऊल उचलण्याचा विचार केला.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील पानशेत धरणात सर्वात भयंकर घटना! लोकांची एकच गर्दी जमली, स्थानिकांमध्येही घबराट

'गरीब लेकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का?'

रोनिशाची आई रीनाने म्हटलंय की, माझा नवरा रिक्षा चालवायचा. त्यांनी आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी लोन घेतलं होतं.आम्ही काय गुन्हा केला? मी घर चालवण्यासाठी कपडे शिवायची. गरीब लेकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का? आम्हाला न्याय पाहिजे.पोलिसांनीही आमची मदत केली नाही. एवढे आठवडे संपल्यानंतरही ते  खोट्या पेजचा शोध लावू शकले नाही. प्रशांतने माझ्या मुलीकडून 10 लाख रूपये जास्त घेतले होते. त्यानंतर त्याने लग्न करण्यात कोणताही इंटरेस्ट दाखवला नाही.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com