जाहिरात

Iran Israel War: रात्रीचा अंधार, मृत्यूचं सावट अन् भारताचं साहस! इराणमधून मुंबईत कसं आलं तेलाने भरलेलं जहाज

इराणच्या क्षेपणास्त्रांपासून वाचण्यासाठी कॅप्टननी जहाजाची सर्व ट्रॅकिंग सिस्टिम बंद केली होती.

Iran Israel War: रात्रीचा अंधार, मृत्यूचं सावट अन् भारताचं साहस! इराणमधून मुंबईत कसं आलं तेलाने भरलेलं जहाज
  • स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारताचे तेलवाहू जहाज शेनलोंग सुरक्षितपणे मुंबईत पोहोचले
  • कॅप्टन सुखशांत सिंह संधू यांनी जहाजाची ट्रॅकिंग सिस्टिम बंद करून युद्धकालीन रणनीती वापरली
  • भारतासाठी 135335 मेट्रिक टन कच्चे तेल वाहून नेणारे हे जहाज ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष, इराणचे क्षेपणास्त्र हल्ले आणि अमेरिका-इस्रायलमधील तणाव यामुळे संपूर्ण जग वेठीस घरलं गेलं आहे. या पार्श्वभूमीवर 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्ग मानला जात आहे. इथून कोणतंही जहाज बाहेर जावू देणार नाही असा इशारा इराणने दिला होता. या इशाऱ्यानतंर ही  याच होर्मुज सामुद्रधुनीतून भारताचं तेलवाहू जहाज सुरक्षित बाहेर पडणे आहे. हा एक चमत्कार मानला जात आहे. 'शेनलोंग' (Shenlong) असे या सुएझमॅक्स जहाजाचं नाव आहे. भारतीय कॅप्टन सुखशांत सिंह संधू यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. बुधवारी या जहाजाने मुंबई बंदरात नांगर टाकला. पण त्यामागे ही एक थरार आणि साहस दडलं आहे. 

1 मार्च रोजी सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून कच्चे तेल या बोटीत भरण्यात आले होते. मात्र 8 मार्च रोजी हे जहाज रडारवरून गायब झाले होते. शत्रूच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून वाचण्यासाठी कॅप्टन संधू यांनी 'AIS' (Automatic Identification System) बंद करून 'गोइंग डार्क' या युद्धकालीन रणनीतीचा वापर केला. त्यामुळे 1 दिन हे जहाज अदृश्य राहिले. याच काळात या जहाजाने होर्मुज सामुद्रधुनी पार केली. यावेळी युद्ध सुरू होते. एक छोटीशी चुकही महागात पडली असती. डोक्यावर मृत्यूचे सावट होते. अशा स्थितीत संधू यांनी हे जहाज मार्गस्थ केले.  पुढे सर्वात धोकादायक पट्टा ओलांडल्यानंतरच जहाज पुन्हा रडारवर दिसू लागले.

नक्की वाचा - Petrol Diesel: पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? LPG गॅसचा साठा संपलाय? काय आहेत सत्य? वाचा सरकारचा मोठा निर्णय

भारताच्या एकूण तेल आयातीपैकी 50% पेक्षा जास्त तेलाची आयात ही याच मार्गावरून होते. युद्धामुळे हा मार्ग जवळजवळ बंद झाला होता. त्यामुळे तब्बल 135335 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन आलेले हे जहाज भारतासाठी मोठा दिलासा ठरले आहे. भारताचे इराणसोबतचे राजनैतिक संबंध आणि परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका यामुळे भारतीय क्रू असलेल्या या जहाजाला सुरक्षित मार्ग मिळाल्याचे बोलले जात आहे. जेव्हा इराण आणि अमेरिकेच्या संघर्षात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100 च्या पार गेले होते, तेव्हा हे जहाज 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून जात होते. 

नक्की वाचा - Iran Vs Israel-US War: इराण-अमेरिका यु्द्ध थांबणार? आखातातील आग विझणार, हे आहेत 5 संकेत

इराणच्या क्षेपणास्त्रांपासून वाचण्यासाठी कॅप्टननी जहाजाची सर्व ट्रॅकिंग सिस्टिम बंद केली होती. जणू काही एखादे भूत-जहाज चालवावे तसा हा प्रवास होता. संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला होता, पण अखेर हे जहाज मुंबईच्या जवाहर दीप टर्मिनलवर दिमाखात उभे राहिले. जिथे अमेरिका आणि युरोपची जहाजे इराणच्या निशाण्यावर आहेत, तिथे भारताने आपले कौशल्य दाखवले आहे. 135335 मेट्रिक टन कच्च्या तेलासह हे जहाज येणे, ही भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठी बातमी आहे. यामुळे आगामी काळात भारताच्या तेल साठ्याबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे. या जहाजावर एकूण 29 कर्मचारी होते, ज्यांनी मृत्यूच्या छायेत हा प्रवास पूर्ण केला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com