Maratha Reservation: मराठा आरक्षण जीआरवरून जरांगेंचं समाधान नाहीच? जीआरमध्ये अजूनही त्रुटी राहिल्याची चर्चा

जीआर काढल्यावर देखील जरांगेंकडून अभ्यासकांना बोलावले जात आहे. तर जरांगे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ विखे पाटील यांची भेट घेऊन जीआरमध्ये काही सुधारणा करण्यासाठी सूचना करणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या नवीन जीआरवरून मराठा आरक्षण अभ्यासकांमध्येच मतमतांतरे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण जिंकलो आता दिवाळी साजरी करा म्हणणारे मनोज जरांगे देखील जीआरवर पूर्णपणे सहमत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जीआर काढल्यावर देखील जरांगेंकडून अभ्यासकांना बोलावले जात आहे. तर जरांगे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ विखे पाटील यांची भेट घेऊन जीआरमध्ये काही सुधारणा करण्यासाठी सूचना करणार आहेत. काही दस्तऐवज सादर करणार आहे. यासाठी ७ सप्टेंबर रोजी बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले.

(नक्की वाचा-  Manoj Jarange: न्यायालयाच्या एका आदेशामुळे मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? 4 आठवड्यात कारवाईची शक्यता)

तसेच प्रक्रिया राबवत असताना काही त्रुटी आढळल्या तर त्याही लगेच दूर केल्या जाणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईत सरकारने दिलेल्या जीआरवर जरांगेंचं पूर्णपणे समाधान झाले नसल्याचे बोलले जात आहे.

सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "आम्ही काढलेल्या जीआरचा कोणताही परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार नाही. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सरकारने स्वीकारलेली नाही. ज्यांच्याकडे वैध पुरावे आहेत, अशांनाच ओबीसीमध्ये जाण्याचा मार्ग या जीआरने उपलब्ध करून दिला आहे."

Advertisement

(नक्की वाचा-  Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा पुरावा: 'हैदराबाद' आणि 'सातारा' गॅझेटियर नेमकं काय आहे?)

यावर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, "जर आता मराठ्यांचा विश्वासघात झाला, तर त्यांचा या विभागातील विषयच संपतो, मात्र ते आता विश्वासघात करणार नाहीत."

Topics mentioned in this article