रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News: पुणे शहरातील 'जैन बोर्डिंग हाऊस' (Jain Boarding House) जमीन विक्री प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात बिल्डरने माघार घेतली आहे. त्यानंतरही हा सर्व व्यवहार रद्द झाल्याचा कागद हातात मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आचार्य गुप्तीनंदी महाराज (Acharya Guptinandi Maharaj) यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्या (बुधवार, 29 ऑक्टोबर 2025) देशभरातील जैन समाज (Jain Community) एक दिवसाचा उपवास (One-Day Fast) करून या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे. गुप्तीनंदी महाराज यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.
'कागद मिळेपर्यंत आंदोलन सुरू'
आचार्य गुप्तीनंदी महाराजांनी घोषणा केली की, या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि पुढील वाटचालीस बळ देण्यासाठी उद्या देशभरात जैन समाजातील सर्व नागरिक एक दिवसाचा उपवास करणार आहेत.
"काल बिल्डरने माघार घेतली आणि आज ट्रस्टींनी सुद्धा माघार घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्यांना Affidavit (शपथपत्र) सादर करायचे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Big Breaking! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8th Pay Commission मंजूर, 'या' तारखेपासून लागू होणार? )
महाराजांनी ठामपणे सांगितले की, "व्यवहार रद्द होण्याचा कागद हातात मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील." ते पुढे म्हणाले, "अजून 2 दिवस आम्हाला साधना आणि आंदोलन सुरू ठेवावे लागेल. पूर्णपणे लढाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील."
राजकीय नेत्यांनी लक्ष घातले
या आंदोलनामुळे केंद्र आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या गोष्टीत लक्ष दिले आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनीही यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे आचार्य गुप्तीनंदी महाराजांनी स्पष्ट केले.