लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाचं भाषण असो वा लोकशाहीची व्याख्या असो.. भुऱ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. यामागे केवळ त्याची भाषण करण्याची शैलीच कारणीभूत नाही तर यामागे भल्याभल्यांना जमत नाही असा उपहासात्मक कला आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या (78th Independence Day) निमित्ताने भुरा म्हणजेच कार्तिक वजीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) व्हायरल होत आहे.
या भाषणात त्याने राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर शेलक्या भाषेत ताशेरे ओढले आहे. राज्य सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांचा देखील बोलबाला सुरू झाला आहे. सरकारने मोठ्या माणसांसाठी पगार सुरू केला मग आम्ही बारक्यांनी सरकारच काय घोडं मारलं आहे, असा सवाल त्याने यावेळी उपस्थित केला.
नक्की वाचा - मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!
आम्हा बारक्या पोरांसाठी सरकारने बारकं लेकरू योजना आणावी अशी मागणी कार्तिक वजीर या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या भाषणातून केली आहे. कार्तिकची याआधी अनेक भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आज त्याने त्याच्या अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त दमदार भाषण ठोकत लहान मुलांसाठी बारकं लेकरु योजना आणण्याची मागणी केली आहे.
महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणली, त्याशिवाय तरुणांनाही महिन्याला काही निधी दिला जात आहे. अशात लहान मुलांना 'बारकं लेकरू योजना' आणण्याची मागणी कार्तिक वजीरनं केली आहे. यापूर्वीही प्रजासत्ताक दिनावेळी त्याने केलेलं भाषण प्रचंड व्हायरल झालं होतं. या भाषेत त्याने लोकशाहीची व्याख्याच समजावून सांगितली होती.
आम्ही बारकाल्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलंय? सरकारने बारकं लेकरू योजना आणावी, अशी मागणी कार्तिक वजीरचं आपल्या भाषणात केली आहे. शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कार्तिकने भाषण केलं. कार्तिक उर्फ भुऱ्या लक्षवेधी भाषण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कष्ट करा शहाणे व्हा, आई-वडिलांच्या प्रेमाशिवाय काहीही फुकट मिळत नाही, असा त्याने नागरिकांना दिला आहे.