मोसीन शेख
जावेद शेख हे नाव सध्या महाराष्ट्रात चर्चेतलं नाव आहे. या नावाचीच चर्चा सध्या राज्यभरात होताना दिसत आहे. हा जावेद शेख साधासुधा माणूस नाही. तर तो तब्बल 500 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरची तब्बल सहा एकर जमीन जावेद शेखच्या नावावर आहे. एवढी पाचशे कोटींची संपत्ती असणारा जावेद शेख काय काम करतो असा तुम्हाला ही प्रश्न पडला असेल. तर त्याचे उत्तर आहे तो ड्रायव्हर आहे. विश्वास पटत नाही तर हे खरं आहे तो एक ड्राव्हर आहे. पण तो कुणाचा ड्रायव्हर आहे हे ही तितकेच महत्वाचे आहे. तर तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचा तो ड्रायव्हर आहे.
त्यामुळे एक ड्रायव्हर असलेल्या जावेद शेखकडे एवढी पाचशे कोटींची संपत्ती आली कशी असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तसा प्रश्न इन्कम टॅक्सला ही पडला आहे. त्यामुळेच जावेद शेखला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय. ही नोटी आल्यामुळे चौकशी होवू शकते असं सीए असलेले रोहन आचालीय यांनी सांगितलं. अशा या तब्बल 500 कोटींचा मालक असलेल्या जावेद शेखचं घर कसं असेल याचा विचार सर्वांच्याच मनात आला. त्याचे घर पाहण्यासाठी NDTV मराठीने त्याच्या घराचा पत्ता शोधत शोधून काढला. संभाजीनगरमधल्या पुंडलिक नगरातल्या हुसेन कॉलनीमध्ये त्याचं घर आहे. जावेदचं घर सापडलं तेव्हा धक्का बसला. तसो तो सर्वांनाच बसेलकारण पाचशे कोटींचा मालक पत्र्याच्या घरात राहतो.
जावेद शेखचं घर अतिशय सामान्य स्वरूपाचं आहे. त्याच्या घरावर पत्रे आहेत. जावेद शेखकडे सहा एकर जमीन असल्याचं आणि पाचशे कोटींची जमीन असल्याचे आरोप एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केले होते. आता जावेद शेखला नोटीस आल्यानंतर जलील यांनी पुन्हा भुमरेंवर निशाणा साधला आहे. जावेद शेखकडे असलेली जमिन नक्की कुणाची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हे सर्व संशय निर्माण करणारे आहे असं ही त्यांनी सांगितलं. सहा एकर जमीन ही हैदराबादच्या सालारजंग कुटुंबानं हिबनामा पद्धतीनं आपल्याला दिल्याचा जावेद शेखचा दावा आहे. हिबनामा म्हणजे सालारजंग कुटुंबानं ही जमीन भेट म्हणून दिल्याचं शेख सांगत आहे.
नक्की वाचा - Skin Care: पावसाळ्यात त्वचा होत असेल चिकचिक, तर सकाळी उठल्यावर करा 'हे' 7 उपाय
सालार जंग कुटुंब हे निजामाच्या हैदराबाद संस्थानातलं प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखलं जातं. याच जमिनीवर परभणीचे वकील मुजाहिद खान यांचाही दावा आहे. पण त्यानंतर भुमरेंनी आणि त्यांच्या मुलानं दमदाटी करुन जमीन आपल्या ड्रायव्हरच्या नावावर करुन घेतल्याचा आरोप आहे. भुमरे यांचा ड्रायव्हर असलेल्या जावेद शेखचा पगार फार तर 20 हजारांच्या घरात आहे. मग जावेद शेखकडे एवढे पाचशे कोटी कसे आले, याचं उत्तर जावेद शेखलाही देता येत नाही. त्यामुळेच विरोधकांनीही या प्रकरणावरुन शिंदेंना टार्गेट केलं होतं.या प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही यापूर्वी आरोप केले होते. आता तर इन्कम टॅक्सची नोटीस ही आली आहे. त्यामुळे या मागे खरा सुत्रधार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुरुवातीला दीडशे कोटी रुपयांची तीन एकर जमीन जावेदच्या नावे असल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यानंतर जावेदच्या नावावर आणखी चार एकर म्हणजेच एकूण सहा एकर जमीन असल्याचे आरोप झाले. ड्रायव्हरकडे एवढे पैसे नसतील, हे उघड सत्य आहे. त्यामुळे चालकाचे मालक असलेल्या भुमरेंकडेच संशयाचं बोट जात आहे. आता जावेद शेख इन्कम टॅक्सच्या नोटिशीला काय उत्तर देतो, त्यामधून या 500 कोटींच्या जमिनीचं गूढ उकलणार आहे. मात्र या प्रकरणातून विरोधकांना मात्र शिंदे गटाच्या खासदारा विरोधात आयतं कोलीत मिळालं आहे. त्या आधारावर खासदार भूमरेंची ही कोंडी होण्याची शक्यता आहे.