जाहिरात

Russian mother: बाप रडत होता, रशियन आई लेकाला घेवून फुर्रर्रssss!,सर्वोच्च न्यायालय ही हैराण कारण...

वास्तविक, कोलकाता येथील शैकत बसू आणि रशियन नागरिक व्हिक्टोरिया यांच्यातील मुलाच्या ताब्याशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Russian mother: बाप रडत होता, रशियन आई लेकाला घेवून फुर्रर्रssss!,सर्वोच्च न्यायालय ही हैराण कारण...
नवी दिल्ली:

भारतीय वडील आणि रशियन आई यांच्यातील वैवाहिक वादामुळे मुलाच्या ताब्याशी संबंधित एका प्रकरणात, दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला एक धक्कादायक माहिती दिली आहे. पोलिसींनी सांगितलं की रशियन महिला मुलासोबत रशियाला पोहोचली आहे. ती 16 जुलै रोजी बिहार, नेपाळ आणि यूएईमार्गे रशियाला पोहोचली. ती देश सोडून कशी गेली, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे. यामध्ये रशियन दूतावासाचा सहभाग आहे का, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले की, रशियन महिला व्हिक्टोरिया बसू आपल्या अल्पवयीन मुलासोबत भारता बाहेर गेली आहे. आता सरकार तिला राजनैतिक मार्गाने परत आणण्याची प्रक्रिया सुरू करेल. केंद्र सरकारतर्फे एएसजी ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की, ती देश सोडून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नक्की वाचा - Food News: केळी खाणे कोणी टाळावे? 'या'लोकांसाठी केळं विषा समान, डॉक्टरांनी काय सांगितलं?

रशियन दूतावासाच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हे प्रकरण गंभीर आहे. शिवाय कोर्टाचा हा अवमान आहे. रशियन दूतावासाच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी असं ही कोर्टाने सांगितले. दिल्ली पोलिसांनी सांगितले, "आम्ही तपास करत आहोत." सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की, पासपोर्ट कोर्टात जमा होता अशा वेळी ती देश सोडून कशी गेली असा प्रश्नही कोर्टाने केला आहे. रशियन दूतावासातील कोणत्याही अधिकाऱ्याच्या मदतीने डुप्लिकेट पासपोर्ट बनवला गेला का? असा प्रश्नही कोर्टाने केला. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात यावा. भारतामधून नेपाळ-यूएई आणि रशियाला दूतावासाच्या मदतीशिवाय विमानाने जाणे कसे शक्य आहे? अशी विचारणाही करण्यात आली. 

रशियन महिला दूतावासाच्या अधिकाऱ्यासोबत दिसली
या प्रकरणात, न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात मुलाला तीन दिवस आईकडे आणि चार दिवस वडिलांकडे ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु 7 जुलै रोजी रशियन महिला मुलाला घेऊन गायब झाली. तिला शेवटच्या वेळी रशियन दूतावासातील एका अधिकाऱ्यासोबत दूतावासात पाहिले गेले होते. कोर्टाने दिल्ली पोलिसांना मुलाला लवकरच शोधून वडिलांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटले की, रशियन महिला मुलाला घेऊन देश सोडून जाणार नाही याची खात्री प्रत्येक परिस्थितीत केली पाहिजे. कोर्टाने परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाला महिलेविरुद्ध लुक-आउट नोटीस जारी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय रशियन महिलेचा पासपोर्ट तात्काळ जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना प्रकरणाचा सविस्तर तपास करून एका आठवड्यात स्टेटस रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे.

नक्की वाचा - Skin Care: पावसाळ्यात त्वचा होत असेल चिकचिक, तर सकाळी उठल्यावर करा 'हे' 7 उपाय

प्रकरण काय आहे ते जाणून घ्या
वास्तविक, कोलकाता येथील शैकत बसू आणि रशियन नागरिक व्हिक्टोरिया यांच्यातील मुलाच्या ताब्याशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या काळात, सर्वोच्च न्यायालयाने या पती-पत्नीमधील साडेचार वर्षांच्या मुलाच्या ताब्याबाबत मध्यस्थीसह अनेक पावले उचलली होती. ज्याच्या आधारावर कोर्टाने सुरुवातीला मुलाचा ताबा एका दिवसात २० तास वडिलांकडे आणि उर्वरित चार तास आई व्हिक्टोरियाकडे ठेवण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश दोन महिन्यांसाठी होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सुधारणा करून एका आठवड्यात तीन दिवस ताबा आईकडे आणि उर्वरित चार दिवस ताबा वडिलांकडे ठेवण्याची परवानगी दिली होती. याच दरम्यान, जुलैमध्ये मुलाचा ताबा रशियन महिलेकडून वडिलांना मिळाला नाही. तेव्हा वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करून मुलाचा आणि व्हिक्टोरियाचा कोणताही पत्ता लागत नसल्याचे सांगितले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com