छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगाकडून सुरु असलेल्या तपासणीदरम्यान तब्बल 19 कोटींचे दागिने सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगरहून-जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे हे दागिने होते. गुरुवारी सायंकाळी चेकपोस्टवर स्थिर पथकाने ही कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवरील सिल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर वाहनाची तपासणी केली जात होती. या तपासणीदरम्यान यात 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती आहे. सर्व दागिने पकडून जीएसटी विभागाच्या स्वाधीन केरण्यात आले आहेत.
दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाणार आहे.