हिंदूंचे 7 अन् मुस्लिमांचे 7 ताबूत; सांगलीत मोहरमची दीडशे वर्षे जुनी अनोखी परंपरा

ताबूतांच्या भेटीसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव परंपरेला 18 पगड जातीतील लोकांमध्ये मान आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी

हिंदू - मुस्लीम ऐक्याचं प्रतिक असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव मोहरमला (Muharram 2024) दीडशे वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी उंच उंच ताबुतांच्या भेटीचा अनोखा मिलाफ पाहावयास मिळतो. या गावात मुस्लीम समाजाच्या विविध सणांना हिंदू नागरिकांना मान तर हिंदू समाजाच्या सणांना मुस्लीम समाजाला मान अशी प्रथा गेल्या दीडशे वर्षांपासून सुरू आहे. हिंदूचे 7 ताबूत तर मुस्लीम बांधवांचे 7 ताबूत असे ताबूत मिळून भेटीचा कार्यक्रम असतो. आता या मोहरमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे ऐतिहासिक परंपरेला दीडशे वर्षांची परंपरा अजूनही अबाधित आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसा झाला कार्यक्रम?

बुधवारी( दि 17)  सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापुर, सोहोली, निमसोड, वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत- गाजत आणण्यात आले त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी 11 वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला. हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे,हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान , त्तार, शेटे, आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला. आणि सातभाई- पाटील - बागवान - अत्तार - हकीम,देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी झाल्या. 

राम-भरताची भेट

या भेटी म्हणजे  राम-भरताची भेट म्हणून सांगलीकरांनी आकाशात टोप्या उंचावून त्याचं स्वागत केलं. त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले.यावेळी 'इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद, धुला.. धूला' आशा घोषणा देण्यात येत होत्या. दरम्यान वाटेत तांबोळी, व अन्य ताबूत सहभागी झाले.त्यानंतर माईनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आला.

( नक्की वाचा : 'लाडकी बहीण'नंतर 'लाडका भाऊ' योजना, वाचा कसे मिळणार तुम्हाला महिना 10 हजार रुपये? )
 

मानकऱ्यांमार्फत इनामदार आणि सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले. सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) या ठिकाणी एकत्रित केले गेले. त्या ठिकाणी "महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकर","तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा' 'हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे" अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. त्यानंतर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला.

Advertisement

या कार्यक्रमासाठी सकाळपासून विटा,कराड,सांगली,सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कर्नाटकातून लोक मिळेल त्या वाहनाने कडेगावला येत होते. गावातील रस्ते, गल्ली बोळ आबालवृद्धांनी गजबजून गेले होते.