Kalyan Building Collapse : कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू

Kalyan Building Collapse : मंगळवारी दुपारी ही इमारत कोसळली. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचं काम सुरु होतं, अशी माहिती आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:


अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan Building Collapse  कल्याण पूर्वमधील धोकादायक इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 2021 मध्ये ही इमारत बांधण्यात आल्याची माहिती आहे. मंगळवारी दुपारी ही इमारत कोसळली. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचं काम सुरु होतं, अशी माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे प्रमिला साहू (58), नामस्वी शेलार, (2) सुनिता साहू (37) सुजाता पाडी (32), सुशीला गुजर (78) आणि काम करणारा मिस्त्री व्यंकट चव्हाण (32) अशी आहेत. या घटनेत जखमी झालेल्यांची नावे विनायक पाडी (4), शार्वील शेलार (4) अरुणा गिरनारायणा, यश शिरसागर (13) श्रद्धा साहू (14) आणि निखिल खरात अशी आहेत. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृत्यमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णलायात पाठविण्यात आले आहेत. अग्नीशमन दलाने इमारतीत अडकलेल्या अडीच वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका केली आहे.

धोकादायक इमारत

ही इमारत धोकादायक होती, अशी माहिती आहे. या इमारतीमध्ये 50 कुटुंबं राहत होती.  या इमारतीला महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी पावसाळ्यापूर्वी देण्यात येत असलेली धोकादायक इमारतीची नोटिस बजावली होती. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरु होते. या दुरुस्तीच्यचा कामाची परवानगी घेतली होती का या प्रश्नाचे उत्तर महापालिका प्रशासनाला देता आले नाही.  

Advertisement

( नक्की वाचा :  New Housing Policy : 5 वर्षांमध्ये 35 लाख घरांची लॉटरी! काय आहे राज्याचे गृहनिर्माण धोरण? वाचा A to Z माहिती )

ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर दाट लोकवस्ती आहे. रुग्णवाहिका आणि अग्नीशमन दलाची वाहनं पोहचू शकत नव्हते. त्यामुळे मदत कार्य करताना रुग्णालयेच कर्मचारी आणि अग्नीशमन दलाच्या जवानाना अडथळे येत होते. त्यात बघ्यांनी एकच गर्दी केली होती. मदत कार्य करताना आसपासच्या परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मदत कार्य सुरु असताना पावसाने हजेरी लावली. पावसामुळेही मदत कार्य थोडावेळ मंदावले होते. 

इमारतीच्या आसपास चाळी असल्याने ही धोकादायक इमारत त्याठिकाणी कोसळली तर मोठी जिवीत हानी होऊ शकते. त्यामुळे आसपासच्या चाळीत राहणाऱ्या 200 जणांना महापालिका प्रशासनाने नुतन विद्यालयात राहण्याची व्यवस्था केली आहे.

Advertisement