KDMC Latest News : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर वसूली विभागाकडून मालमत्ता कर थकविणाऱ्यां विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. मांडा टिटवाळा परिसरातील जी.आर.पाटील माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजने 1 कोटी 28 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. महापालिकेच्या कर वसूली विभागाने शाळेचे आणि मुख्याध्यापकांचे कार्यायल सील केले आहे. या कारवाईमुळे शाळा व्यवस्थापनास मोठा धक्का बसला आहे.
महापालिकेची सगळी मदार ही मालमत्ता कराच्या वसूलीवर आहे.महापालिकेने यंदाच्या वर्षी मालमत्ता कर वसूलीचे लक्ष्य 500 कोटी रुपये ठेवले आहे. आत्तापर्यंत महापालिकेने 320 कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिका हद्दीत न्यायप्रविष्ट प्रकरणे धरून मालमत्ता कराची थकबाकी 2 हजार 500 कोटी रुपयांच्या घरात आहे.मालमत्ता कराची थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे महापालिका मालमत्तांना सील करते. त्यानंतर त्या मालमत्तांचा लिलाव करते.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याणमध्ये शेतकऱ्यांचे भूखंड लाटले? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बांधकामांना स्थगिती
महापालिकेने शाळा आणि मुख्याध्यपकांचे कार्यायल केले सील
लिलाव करते. महापालिकेने मांडा टिटवाळयातील जी. आर. पाटील शाळा आणि ज्युनिअर का'लेजच्या विरोधात धकड कारवाई करीत शाळा आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय सील केले आहे. महापालिकेचे कारवाई पथक शाळेत पेहचले तेव्हा शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या विश्वस्तांचे कार्यालय सील करा अशी विनंती केली. मात्र त्यांची विनंती महापालिकेच्या कारवाई पथकाने मान्य केली नाही. महापालिकेने शाळा आणि मुख्याध्यपकांचे कार्यायल सील केल्याने त्या कार्यालयात इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे आहे.
या शाळेत परिक्षेचे केंद्र आले नसले तरी शाळेतील विद्यार्थ्यांची तोंडी परिक्षा सुरु आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असल्याने किमान परिक्षा काळात ही कारवाई टाळली गेली पाहिजे होती, अशी आपेक्षा पालक,विद्यार्थी आणि शिक्षक वर्गासह व्यवस्थापनाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र शाळा व्यवस्थापनानेही वेळीच मालमत्ता कराची थकबाकी भरली असती तर ही वेळ व्यवस्थापनावर आली नसती. ही शाळा महापौर हर्षाली थविल यांच्या प्रभाग परिसरातील आहे. शाळेच्या प्रतिनिधींनी आज महपौरांची भेट घेऊन कारवाई झाल्याची माहिती दिली आहे.