जाहिरात

Kalyan News : कल्याणमध्ये शेतकऱ्यांचे भूखंड लाटले? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बांधकामांना स्थगिती

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतकरी शेडसाठी राखीव असलेल्या जागेवर 'व्यापारी गाळे' बांधले जात आहे.

Kalyan News : कल्याणमध्ये शेतकऱ्यांचे भूखंड लाटले? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बांधकामांना स्थगिती
Kalyan News Today
मुंबई:

Kalyan News Today : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतकरी शेडसाठी राखीव असलेल्या जागेवर 'व्यापारी गाळे' बांधले जात आहे. या प्रकरणी बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी विरोध केला आहे. पाटील यांनी याप्रकरणी पणन खात्याकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची दखल घेत पणन संचालकांनी व्यापारी गाळे बांधकामास स्थगिती दिली आहे. 

या प्रकरणातील तक्रार आणि याचिकाकर्ते तथा बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी म्हटलंय की,"बाजार समितीने शेतकरी शेडच्या जागेवर व्यापारी गाळे बांधण्याचा प्रस्ताव आणला होता. त्या प्रस्तावाला मी संचालक असताना विरोध केला होता. मात्र त्यानंतर आमचा कार्यकाळ संपला. त्यानंतर प्रशासकाने या प्रकरणात निविदा प्रक्रिया केली. तसच डीडीआर आणि पणन संचालकांकडे तक्रार केली होती.पण त्यांनी दखल घेतली नाही"

या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये न्यायालयाने आदेश दिले की,31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर कारवा. या प्रकरणात तत्कालीन संचालक 31 नोव्हेंबर रोजी सेवा निवृत्त झाले.5 डिसेंबर रोजी पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकाना या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल देण्याबाबत सांगितलं.  या प्रकरणात उपजिल्हा निबंधकांनी कोणताही अहवाल सादर केला नाही. 

नक्की वाचा >> Navi Mumbai: WhatsApp ग्रुपवरून 31.50 लाखांची फसवणूक, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार, 'कसा' झाला पर्दाफाश?

20 गाळ्यांच्या बांधकामास स्थगिती

पणन संचालकांनी आणि जिल्हा उपनिबंधकांनाही सुनावणीसाठी बोलवले होते. परंतु, जिल्हा उपनिबंधक अनुपस्थित होते. त्या सुनावणीस पाटील उपस्थित होते.त्यानंतर पुन्हा सुनावणी झाली. या प्रकरणी सखोल चौकशी करुन यात अनियमिता असल्याचं समोर आलं.त्यानंतर पणन संचालकांनी    शेतकीर शेड आणि 20 गाळ्यांच्या बांधकामास स्थगिती दिली आहे. 

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे.या प्रकरणात लक्ष घालावे. सरकारची फसवणूक केली जात आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या भूखंडावर व्यापारी गाळे बांधून शेतकरी वर्गाची दिशाभूल करीत आहे.ज्या कारणासाठी हा भूखंड आहे.त्या कारणासाठीच त्याचा वापर केला जावा, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Sun Sun Sunday...विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनोखी पद्धत, 2 कोटी लोकांनी पाहिला सरकारी शिक्षकाचा Funny Video

या संदर्भात बाजार समितीचे सभापती रविंद्र गोडविंदे यांनी म्हटलंय की, "बाजार समितीच्या आवारात 20 गाळे बांधण्याचे काम सुरु आहे. बाजार समितीची निवडणूक होण्यापूर्वीच त्याची निविदा प्रक्रिया झाली होती. यासंदर्भात तक्रार दाखल झाली होती. पणन संचालकांनी या प्रकरणी 16 फेब्रुवारीपर्यंत   स्थगिती दिली आहे.कागदपत्रे आणि बांधकामांचे पुरावे त्यांना हवे आहेत.ते सादर करण्यासाठी ही स्थगिती दिलेली आहे".

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com