Kalyan Dombivli Metro : कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक गुड न्यूज आहे. या भागातील मेट्रो 12चा (Mumbai Metro 12) महत्त्वाचा ठप्पा पूर्ण झाला आहे. शिळफाटा रोडवरील डोंबिवली MIDC मेट्रो स्टेशनजवळ 100 वा U-गर्डर यशस्वीरित्या लाँच करण्यात आला आहे. ही प्रकल्पाच्या बांधकामातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, ज्यामुळे आता या ऑरेंज लाईनच्या कामाला आणखी वेग मिळणार आहे.
कशी आहे मेट्रो 12 ?
सुमारे 23.57 किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग आहे. या मार्गावर एकूण 19 मेट्रो स्टेशन्स असतील. कल्याण, डोंबिवली, तळोजा आणि पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट, अखंड आणि जलद मार्गाने जोडणार आहे. यामुळे ठाणे आणि नवी मुंबईदरम्यान प्रवासाचा एक स्वच्छ, सुलभ आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होईल. त्याचबरोबर, कळवा ते तळोजा परिसरातील वाहतूक-आधारित विकासालाही (Transit-Oriented Development) मोठी चालना मिळेल.
अत्याधुनिक अभियांत्रिकीचा समावेश
कळवा-शिळफाटा-तळोजा मार्गाला समांतर धावणारा हा कॉरिडॉर तब्बल 7 किलोमीटर MSRDC फ्लायओव्हरच्या एकत्रित रचनेसह उभा राहत आहे. या प्रकल्पात अभियांत्रिकी कौशल्याची अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. यात कोळेगावजवळचा 100 मीटरचा मोकळा स्पॅन, महत्त्वाचे रेल्वे आणि ROB क्रॉसिंग्ज, तसेच 21 ते 23 मीटर उंचीवरची उन्नत स्थानके यांचा समावेश आहे. पत्रीपूल येथील सेंट्रल रेल्वे ROB वर 65 मीटरचे 2 स्पॅन आणि तळोजा ROB वर 75 मीटरचे स्टील स्ट्रक्चरचा स्पॅन उभारला जाईल.
( नक्की वाचा : CIDCO Home : नवी मुंबईतील सिडकोच्या घरांचे दर 10 टक्क्यांनी कमी; 17,000 घरांच्या लॉटरीबाबत सरकारचा मोठा निर्णय )
प्रवाशांना मिळणार इंटरचेंजची सुविधा
या प्रकल्पामुळे प्रवाशांना इतर प्रमुख मार्गांवर सहज जोडले जाण्यासाठी महत्त्वपूर्ण इंटरचेंज सुविधा उपलब्ध होतील. कळवा येथे मेट्रो लाईन 5, हेडूतने येथे मेट्रो लाईन 14, अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो लाईन 1 आणि कळवा जंक्शनला थेट FOB (Foot Over Bridge) द्वारे सेंट्रल रेल्वेशी कनेक्टिव्हिटी दिली जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
प्रकल्पाची सध्याची प्रगती
या प्रकल्पाची कामे सध्या वेगात सुरू आहेत. कल्याण - मानपाडा येथील सर्व्हे आणि अलाइनमेंट पूर्ण झाली आहे. पहिला पाईल, पियर कॅप आणि U-गर्डरचे कास्टिंग आणि उभारणी यशस्वीरित्या झाली आहे. पूर्ण क्षमतेचा बॅचिंग प्लांट सुरू करण्यात आला असून प्रमुख भागांवर नागरी कामे आणि पियरचे बांधकाम वेगाने सुरू आहे. पत्रीपूल आणि अमनदूत परिसरात भूमी संपादन आणि पुनर्वसनाची प्रक्रिया देखील सुरू आहे.
A Century on Track.
— MMRDA (@MMRDAOfficial) December 11, 2025
The Orange Line is rising.
Mumbai's Metro Line-12 – Orange Line Extension, being built by MMRDA, achieved another major construction milestone with the successful launch of its 100th U-girder near Dombivli MIDC Metro Station on Shilphata Road.
The 23.57-km… pic.twitter.com/tI0Us7e8kv
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world