Kalyan News: खांद्यापर्यंत पाणी, चिमुकल्यासह 3 जण अडकले, पोलीस अधिकारी थेट पाण्यात उतरले अन्...

या धाडसी बचाव मोहिमेमुळे हे चारही जण सुखरूप बाहेर पडले.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यात बरीच कुटुंब ही अडकली आहेत. त्यांना सुखरूप बाहेर ही काढलं जात आहे. पावसाचा फटका हा कल्याण डोंबिवलीला ही बसला आहे. या भागत गेल्या तिन चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भाग हे जलमय झाले आहेत. पडघा येथील गणेश नगर परिसरात तर चक्क  खांद्या ऐवढे पाणी साचले आहे. इथल्या एका घरात चार जण अडकून पडले होते. याची माहिती पडघा पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या बचावासाठी पोलीस धावले. त्यानंतर त्यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. 
  
संपूर्ण कुटुंब पाण्याने वेढलं आहे. ते अडचणीत आहे याची माहिती पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांना मिळाली. त्यांनी मग स्वत: घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहून त्यांनी स्वतः पाण्यात उतरून धाडसी बचावकार्य केले. पडघा गावातील गणेश नगर परिसरात मुसळधार पावसामुळे खांद्यापर्यंत पाणी साचले होते. या पाण्यात एका घरात चार जण फसले होते. त्यामध्ये चार वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश होता. अडकून पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नक्की वाचा - Pune News: मिसिंग लिंक अन् सुरक्षेचे 13 प्रश्न! 'या' नेत्याने एका फटक्यात फेटाळला होता मिसिंग लिंक प्रस्ताव

Advertisement

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी स्वतः पाण्यात उतरून बचावकार्य सुरू केले. खांद्यापर्यंत साचलेल्या पाण्यातून त्यांनी चार वर्षांच्या मुलासह चौघांनाही सुखरूप बाहेर काढले. देविका पवार वय 4 वर्षे, अश्विनी पवार वय 25 वर्षे, संतोष पवार वय 28 वर्षे आणि जोशना साळुंखे 60 वर्षीय महिलेच्या यामध्ये समावेश आहे. ते पाण्यात अडकले होते. 

नक्की वाचा - Siya Goyal: अटक होणार हे सियाला होतं माहित, वाचण्यासाठी तिने लढवली होती नामी शक्कल, 'ते' गुपित उघड

या धाडसी बचाव मोहिमेमुळे हे चारही जण सुखरूप बाहेर पडले. संबंधित कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले आहे. त्यांचे कौतूक ही केले आहे. कल्याण- डोंबिवलीत सध्या पावसाचा जोर आहे. ते पाहून शाळांना ही सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. शिवाय गरज असेल तर घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण पाऊसच इतका होता की पडघा इथं घरातच पाणी शिरलं. त्यांना शेवटी वाचवण्याच पोलीसांना यश आलं आहे.