- मिसिंग लिंक बांधण्यासाठी तब्बल ७१२० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते
- पहिल्या पावसातच या मिसिंग लिंकवर सुमारे १०० टन पेक्षा जास्त मलबा पडला होता
- पर्यावरण आणि धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकल्पाला काँग्रेस आघाडी सरकारने स्थगिती दिली होती
मिसिंग लिंकची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. तब्बल 7,120 कोटी रूपये खर्च करून हा मिसिंग लिंक बांधण्यात आला होता.या महागड्या मिसिंग लिंकची पोल मात्र पहिल्याच पावसात खोलली गेली. मिसिंग लिंगवर तब्बल 100 टन पेक्षा जास्त मलबा पडला होता. मिसिंग लिंकला जणू धबधब्याचं स्वरूप आलं होतं. पहिल्याच पावसात हा मिसिंग लिंक बंद करावा लागला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती मिसिंग लिंक बांधण्यात घाई झाली का? मानव निसर्गाच्या विरोधात जात आहे का? त्यावेळी एक गोष्ट समोर आली आहे की पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने याच मिसिंग लिंकचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्याचं संभाव्य धोके ओळखून हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय कोणत्या नेत्याने आणि का घेतला होता त्याचाच आढावा आपण घेणार आहोत.
मिसिंग लिंक बांधण्याचा मुळ प्रस्ताव हा काँग्रेस प्रणित आघाडी सरकारने घेतला होता. मात्र हा बांधण्या आधी त्याबाबतचा सविस्त अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी पर्यावरणाच्या सर्व गोष्टींचा आढावा घेण्याचे सांगण्यात आले होते. ज्यावेळी काही गोष्टी धोकादायक आणि खटकणाऱ्या वाटल्या त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव एका फटक्यात फेटाळून लावला होता. त्याला कारणं ही तेवढीच गंभीर होती. बोगद्याचा मार्ग हा लोणावळा येथील धरणाच्या जवळपास 200 मीटर खालून जात होता. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. धरणाचे पाणी बोगद्यात झिरपू शकते अशी भीती ही होती. तसेच धरण बोगद्याचे वजन पेलू शकेल का हा प्रश्न ही उपस्थित झाला होता.
इंजिनिअर्सना या सर्व गोष्टींच्या शंका होत्या. त्याच बरोबर या भागातील भौगोलिक रचना बोगद्यासाठी किती सुरक्षित आहे, याबाबत ही काहींनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. त्याचसोबत या भागत होणारी अतिवृष्टी, लँडस्लाईड याचाही विचार केला गेला. त्यामुळे हा मिसिंग लिंक करण्या आधी जास्त अभ्यासाची गरज निर्माण झाली होती. तज्ज्ञांनी ही आपले आक्षेप नोंदवले होते. त्यांच्या मनात प्रकल्पाबाबत शंका होती. तसेच निसर्गाचा कोप होवू शकतो अशी भीती ही होती. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पा मान्यता दिली नाही. उलट त्यांनी या प्रकल्पाची फेरतपासणी करून अहवाल द्या अशी सुचना दिली होती. मात्र खाईगडबडीत हा प्रकल्प रेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही असं आघाडीचे नेते सांगतात.
मिसिंग लिंक बनवण्याच सर्वात मोठा अढथला होता तो, लोणावळा धरणाजवळील भौगोलिक रचना, बोगद्यांचे वजन पेलण्याची क्षमता, अतिवृष्टी आणि भूस्खलनाचा धोका होता. मात्र पुढे आघाडी सरकार गेले आणि युतीचे सरकार आले. मग या मिसिंग लिंकला मान्यता देण्यात आली. जवळपास 7,120 कोटी खर्च करून हा मिसिंग लिंक बांधण्यात आला. जवळपास 13 किमीचा हा मिसिंग लिंक आहे. पण पहिल्याच पावसात हा मिसिंग लिंक बंद ठेवावा लागला. त्यावर मोठ्या प्रमाणात मलबा आला. अक्षरश: धबधबे सुरू झाले. नशिब त्यावेळी कोणती गाडी तिथून जात नव्हती नाही तर मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान काँग्रेस आघाडीच्या काळात बांधण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सी-लिंकचं आता उदाहरण दिलं जात आहे. या सी लिंकला इतकी वर्ष झाली तरी काही झालेलं नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहे. त्या सध्या व्हायरल ही झाल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world