Kalyan News : एका घरासाठी 'फिल्मी' राडा! KDMC मुख्यालयाच्या गेटवर ठेकेदार-लाभार्थी भिडले; पाहा काय घडले...

Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी बीएसयूपी (BSUP) प्रकल्पातील घरावरून मोठा वाद झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News : प्रकल्पाचा ठेकेदार आणि एका लाभार्थी तरुणामध्ये झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
कल्याण:

Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी बीएसयूपी (BSUP) प्रकल्पातील घरावरून मोठा वाद झाला. प्रकल्पाचा ठेकेदार आणि एका लाभार्थी तरुणामध्ये झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केल्यामुळे ठेकेदाराला तेथून जावे लागले.

काय आहे प्रकरण?

महापालिकेच्या रिंग रोड प्रकल्पात ज्या तरुणाचे घर बाधित झाले होते, त्या उमर मन्सूरी यांना महापालिकेकडून उंबर्डे येथील बीएसयूपी प्रकल्पात घर देण्यात आले होते. मात्र, हे घर मिळण्यापूर्वीच मन्सूरी यांनी प्रकल्पाचे ठेकेदार अख्तर ईदरीशी यांच्या विरोधात न्यायालयात केस दाखल केली होती.

बुधवारी उमर मन्सूरी त्यांच्या आई आणि मावशीसोबत घराच्या संदर्भात महापालिका मुख्यालयात आले होते. यावेळी ठेकेदार अख्तर ईदरीशी हा मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा होता. त्याने उमर आणि त्यांच्या आईला अधिकाऱ्यांची भेट घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही उमर त्यांच्या आईसोबत मुख्यालयात प्रवेश केला.

( नक्की वाचा : Dombivli News : आता आठवडी बाजाराची रणधुमाळी! 'बाऊन्सर'च्या आरोपावरून कल्याण-डोंबिवली भाजप-शिवसेनेत संघर्ष )

प्रवेश केल्यानंतर ठेकेदाराने उमर मन्सूरीला त्यांच्या विरोधात दाखल केलेली केस मागे घेण्यास सांगितले. "तुम्हाला तुमचे घर मिळाले आहे, मग केस कशाला चालू ठेवली आहे?" असे त्याने विचारले. जर केस मागे घेतली नाही, तर तो त्यांच्या विरोधातही 'उंगली' (फिर्याद) करेल आणि ते मन्सूरी यांना महागात पडेल, अशी धमकी त्याने दिली.

Advertisement

या धमकावण्याच्या आणि अपशब्दांच्या भाषेमुळे उमर संतापले. एका महिलेसोबत ठेकेदाराची भाषा धमकी देणारी असल्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. यावेळी ठेकेदाराने उमरला मारहाण केली आणि त्याचे टी-शर्ट फाडले. उमर मन्सूरी यांनी आरोप केला आहे की, ठेकेदाराने त्यांच्या आई आणि मावशीला देखील मारहाण केली.

( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांवर जबरदस्ती ! 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )
 

हा वाद पाहून तिथं उपस्थित असलेल्या केडीएमसीच्या सुरक्षा रक्षकांनी त्वरीत धाव घेतली आणि दोघांमध्ये मध्यस्थी केली. सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केल्यामुळे ठेकेदार अख्तर ईदरीशी याला त्या ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला.
 

Advertisement
Topics mentioned in this article