कल्याण लोकसभेत फेरनिवडणूक घ्यावी, ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांची मागणी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील जवळपास 80 हजार मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. त्यांची नावे मतदार यादीतून गायब होती. या प्रकरणी विविध राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता.

Advertisement
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

कल्याण-शीळ रस्त्यावर पिसवली गावाजवळ रस्त्यावर मतदार ओखळपत्रे सापडल्याने एकच खळबळ उडाली. ठाकरे गटाने याची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांना निवेदन  दिले आहे. इतकेच नाही तर कल्याण लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांनी फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. पोलीस तपासात मिळालेले मतदार ओळखपत्रे ही खरी असल्याचे समोर आल्यानंतर ही ओळखपत्रे मतदारांपर्यंत न पोहचता रस्त्यावर कशी टाकण्यात आली, याचा तपास आता पोलिसांनी सुरु केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, धनंजय बोडारे, शहर प्रमुख शरद पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी आज मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राम चोपडे यांना निवेदन दिले. 

Vaishali Darekar

कल्याण लोकसभा मतदारसंघातील जवळपास 80 हजार मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. त्यांची नावे मतदार यादीतून गायब होती. या प्रकरणी विविध राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. आता मतदार ओळखपत्रे मिळून आल्याने निवडणूक प्रक्रियेविषयी शंका व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा- पंकजा मुंडेंची लॉटरी लागणार? भाजप श्रेष्ठींच्या मनात नेमकं काय?

मतदार ओळखपत्रे खरी असल्यास ती मतदारांना का दिली गेली नाही. कुणी अशा प्रकारे लपवून ठेवून निवडणुकीनंतर एका ठिकाणी फेकून दिली. तसेच ज्या मतदारांची ही ओळखपत्रे त्यांच्या नावाने अन्य कुणी बोगस मतदान केले का? ही मतदार ओळखपत्रे बनावट असल्यास त्यांच्या नावाने मतदान करुन झाल्यावर ती फेकून दिली असावी. या प्रकरणी पोलिसांनी योग्य प्रकारे वस्तुनिष्ठ तपास केल्यास हा प्रकार कुणी केला आहे याचा उलगडा होईल, असं वैशाली दरेकर यांनी म्हटलं. 

Advertisement

आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अशा प्रकारे किती मतदार ओळखपत्रे अन्य कुठे फेकून दिली आहेत का? हे उघड होईल. या प्रकाराची निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली पाहिजे. याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

(नक्की वाचा- आजही तिहारमधून सुटका नाहीच, दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांच्या जामीनावर स्थगिती)

तपास करुन कायदेशीर कारवाई करणार 

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी याबाबत म्हटलं की, पिसवली गावात मतदार ओळखपत्रे सापडली होती. जवळपास 700 ओळखपत्रे आहेत. याची माहिती कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना सांगितली. त्यांना पोलीस ठाण्यास बोलावून घेतले. त्यांनी तपासणी केली आहे. ही ओळखपत्रे खरी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
 

Advertisement