Shrikant Shinde Video : श्रीकांत शिंदेंनी मोडला वाहतुकीचा नियम! सर्वसामान्यांचे नियम खासदारांना लावणार का?

जाहिरात
Read Time: 2 mins
Shrikant Shinde Video : श्रीकांत शिंदेंनी मोडला वाहतुकीचा नियम! सर्वसामान्यांचे नियम खासदारांना लावणार का?
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

बाईक चालवताना आपलं डोकं आणि पर्यायानं जीव वाचवण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा, हा वाहतुकीचा पहिला नियम आहे. वाहनचालकांनी या नियमाची अंमलबजावणी करावी, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जागृती केली जाते. पण, तरीही अनेक जण सर्रास हेल्मेट न घालता बाईक चालवत असतात. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Kalyan MP Shrikant Shinde)  देखील त्यापैकीच एक आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कल्याण डोंबिवलीत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या बाईटस्वारांवर कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी सुरु केली आहे.  हेल्मेट न घालणाऱ्या बाईकस्वारांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाते. ज्या चौकात असा प्रकार दिसून येतो. त्या बाईकस्वारांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. 

( नक्की वाचा : Kalyan Crime : विशाल गवळीचा फास आणखी आवळला, 3 भावांवर पोलिसांची मोठी कारवाई )

 हेल्मट न घालता वाहन चालविणाऱ्या बाईकस्वाराच्या विरोधात हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. पण, त्याचवेळी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हेल्मेट न घालता बाईक चालवत होते. शिंदे विना हेल्मेट बीएमडब्ल्यू बाईक चालवत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची सध्या चर्चा सुरु आहे. 

हेल्मेट न घालणाऱ्या सर्वसामान्यांवर होणारी कारवाई खासदार शिंदेंवर होणार का? सर्वसामान्यांचा न्याय खासदारांवर लावणार का? खासदारांनीच नियम मोडले तर सर्वसामान्य नागरिकांना नियम पाळण्याची प्रेरणा कुणाकडून मिळणार? हे प्रश्न या निमित्तानं विचारला जात आहे. 

Topics mentioned in this article