Kalyan News : कल्याण शहरातील वाहतूक कोंडी नवी नाही. या वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालक, प्रवासी, रुग्णवाहिका, शालेय बस यांना बसतो. अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलीसही दिसत नसल्यानं ही कोंडी आणखी वाढते. त्याचा त्रास कल्याणकरांना रोज बसतो. याबाबत सातत्यानं आवाज उठवूनही परिस्थिती फार सुधारलेली नाही. शहरातील ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक चिमुरडा पुढं आलाय. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
काय आहे व्हिडिओ?
या व्हिडिओत एक लहान मुलगा शिट्टी वाजवून पुढे चला काका असे सांगत वाहतूक कोंडी दूर करीत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या किती गंभीर आहे. हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिस आणि केडीएमसी याची दखल घेणार का असा प्रश्न आत्ता वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या नागरीकांकडून विचारला जात आहे.
कल्याण डोंबिवलीत प्रचंड वाहतूक कोंडी
कल्याण डोंबिवलीत प्रचंड वाहतूक कोंडी आहे. कल्याण शीळ रस्त्यावर बैल बाजार परिसरात मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. कल्याण स्टेशन ते बैलबाजारपर्यंत उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहे. त्यामुळे शहरात वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. दररोज वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहे. शहाड पूलाचे काम सुरु होते. तेव्हा 20 दिवस पूलावरील वाहतूक बंद होती.
( नक्की वाचा : Dombivli News : 'तुम्ही घर सोडा, नाहीतर सोडणार नाही'; डोंबिवलीत 90 वर्षांच्या आजीबाईंना भूमाफियांची धमकी )
या काळात कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा आनंद दिघे पूल दुरुस्तीकरीता बंद होता. तो आत्ता खुला केला आहे. पंरतू वाहतूक कोंडी कमी होताना दिसत नाही. सहजानंद चौक ते बैलबाजार चौकापर्यंत वाहतूक कोंडी मोठी असतेय या ठिकाणी चार दिवसापूर्वी पाण्याची जलवाहिनी फुटली होती. एकीकडे मेट्रोचे काम त्या कामा दरम्यान पाईप लाऊन फुटल्याने त्याची दुरुस्ती चार दिवस सुरु होती. त्या कामामुळे दररोज वाहतूक कोडीचा समाना करावा लागला. तीन दिवस या रस्त्यावरील एका शाळा व्यवस्थापनास शाळा बंद ठेवावी लागली.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालक अंतर्गत रस्ते निवडतात. त्यामुळे त्या भागातही वाहतूक कोंडी होत. छत्रपती शिवाजी चौक ते बैलबाजार दरम्यान वाहतूक कोंडी होती. वाहतूक कोंडीचा परिमाण लहान मुलावर झाला आहे. ही वाहतूक कोंडी पाहता कल्याणमध्ये एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा शिट्टी वाजवून पुढे चला काका असे सांगत वाहतूक कोंडी दूर करीत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या किती गंभीर आहे. हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.