कारगिल युद्धात गमावले 2 पाय आणि 1 हात, नाशिकचे 'नायक' आजही देतायत सर्वांना प्रेरणा

Kargil War 25 Years : कारगिल युद्धाला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात नाशिकमधल्या नायक दिपचंद यांनी देखील असामान्य शौर्य गाजवलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली जम्मू काश्मीरमधील कारगिल परिसरात युद्ध झालं होतं. स्वातंत्र्यानंतर दोन देशांमध्ये झालेलं हे चौथं युद्ध. कारगिल आणि परिसरातील लष्करी ठाण्यांचा ताबा घेतलेल्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी मोठ्या शौर्यानं पळवून लावलं. तो संपूर्ण परिसर पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. कारगिल युद्धाची आठवण म्हणून दरवर्षी 26 जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा केला जातो.

या युद्धात लढलेल्या जवानांच्या शौर्यगाठा सर्वसामान्य नागिकांपर्यंत पोहोचवण्याचा यामागे उद्देश असतो. कारगिल युद्धाला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात नाशिकमधल्या नायक दिपचंद यांनी देखील असामान्य शौर्य गाजवलं आहे. कारगिल युद्धात त्यांनी दोन्ही पाय आणि एक हात त्यांनी गमावला होता मात्र आजही त्यांच्यातील उत्साह, देशप्रेम हे तरुणांना लाजवेल असेच आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मूळचे हरियाणाच्या हिसारचे रहिवासी असलेले दीपचंद हे 1994 साली सैन्य दलात भरती झाले होते.घरी 6 भाऊ, बहिणी होते मात्र देशसेवेत दाखल झालेले ते एकमेव होते. त्यांचे आजोबा त्यांना देशभक्तीपर गोष्टी सांगत असत. त्याचबरोबर घरात असलेला सुभाषचंद्र बोस यांचा फोटो आणि त्याखाली लिहिलेली तुम मुझे खून दो, मे तुम्हे आजादी दूगा या ओळीवर ते प्रेरीत झाले होते.. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्याने सुमारे 60 दिवस लढा दिला होता. पाकिस्तानी सैन्यावर भारतीय लष्कराचा वरचष्मा होता. दीपचंद हे या युद्धात रणभूमीवर होते. 

पण याच युद्धादरम्यान क्षेपणास्त्र रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या दीपचंदसोबत एक भीषण अपघात झाला, ऑपरेशन पराक्रम दरम्यान दीपचंद आणि त्यांचे साथीदार परतीच्या तयारीत होते मात्र त्याचवेळी तोफेचा गोळा फुटला.. दिपचंद यांची जगण्याची शक्यता कमी होती, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दोन्ही पाय आणि एक हात कापला होता, त्यांचं इतकं रक्त वाया गेले होते की डॉक्टरांनी तब्बल 17 बाटल्या रक्त दिले होते.. आजही कारगिलच्या या सर्व आठवणी सांगताना ते भावूक होतात.

Advertisement

( नक्की वाचा : कारगिल @ 25 : सोनूला सांगा PCM चे कोचिंग घे, हुतात्मा मनोज पांडेंचं शेवटचं पत्र वाचून येईल डोळ्यात पाणी )

 मात्र एवढं सगळं घडूनही इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर दिपचंद हे सामान्य नागरिकाप्रमाणेच आजही आयुष्य जगतायत. त्यांचे गुडघ्यापर्यंत दोन्ही पाय कृत्रिम आहेत मात्र ते बिनधास्तपणे आपली कार चालवतात. त्यांनी गाजवलेलं शौर्य, आणि देशप्रेम पाहून त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. देवळाली कॅम्प परिसरातील त्यांच्या भारत निवास या घरावर तिरंगा नेहमी अभिमानाने फडकतो.. कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या आपल्या साथीदारांचे त्यांनी घरभर फोटो देखील लावले आहे. दीपचंद सारख्या सैनिकांचा आजही आम्हा भारतीयांना अभिमान आहे.