- महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केली आहे
- मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रे याला अटक करण्यात आली असून त्याला सध्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे
- मनसे डोंबिवली प्रमुख हर्षद पाटील यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यावर प्रकरण दडपण्याचा आरोप केला आहे
अमजद खान
शास्त्रीनगर इथल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सना मारहाण प्रकरण सध्या चांगलच गाजत आहे. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला अटक झाली आहे. शिवाय त्याची रवानगी आता पोलिस कोठडीत झाली आहे. मात्र या प्रकरणात ज्या पद्धतीने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी भूमीका घ्यायला पाहीजे होती तशी घेतली नाही याबाबत आता टिकेची झोड उठली आहे. मनसे डोंबिवली प्रमुख हर्षद पाटील यांनी तर या घटनेनंतर आयुक्तांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी जो आरोप केला आहे त्याने सर्वच जण हादरले आहेत. शिवाय या प्रकरणात त्यांच्या चौकशीची ही मागणी केली आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटल हे महत्वाचं हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सला नगरसेवक रमेश म्हात्रे यांने मारहाण केली. सुरूवातीला या घटनेबाबत कुणीच आवाज उचलला नाही असं मनसेचे डोंबिवली प्रमुख हर्षद पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे आता केडीएमसी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाटील यांनी सांगितलं की 6 जुलैला रात्री ही घटना झाली. डॉक्टर आणि नर्स यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर 7 तारखेला मारहाण झालेले डॉक्टर आणि नर्स केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना तब्बल तीन तास आयुक्तांनी त्यांच्या दालना बाहेर उभे केले होते असा आरोप पाटील यांनी केला आहे. हे डॉक्टर आणि नस्र तीन तास आयुक्तांच्या निरोपाची वाट पाहात होते.
मात्र तिन तासानंतर आयुक्त त्यांना भेटलेच नाही. उलट त्यांनी या पिडीत डॉक्टर नर्सना अतिरिक्त आयुक्तांना भेटा असा निरोप दिला असा दावाच मनसेच्या हर्षद पाटील यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी आयुक्तांना काही प्रश्न केले आहेत. ज्या रूग्णालयात ही घटना घडली ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे आहे. अशा वेळी ती जबाबदारी ही आयुक्तांची होती. अशा वेळी त्यांनी पुढाकार घेवून पोलीसात तक्रार का दाखल केली नाही असा प्रश्न मनसेने केले आहे. शास्त्रीनगर हे महापालिकेचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोणत्या ही सोयी- सुविधा नाहीत. त्यामुळे ही घटना इथं झाली. हॉस्पिटलमध्ये सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने नेमके काय केले? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाचे प्रमुख हे आयुक्तच असतात. सीसीटीव्ही असताना, तिथे उपस्थित लोकांनी दिलेली माहिती असताना आयुक्त पोलीसात का गेले नाहीत असा प्रश्न ही होत आहे. हॉस्पिटलमध्ये सुविधा नसतील, यंत्रणा नसेल तर त्याची जबाबदारी ही आयुक्तींचीच आहे. कल्याण डोंबिवलीत अनेक वर्ष प्रशासक होते. आता नगरसेवक आले आहे. गेल्या काही वर्षात या शहरासाठी जो निधी आला तो कुठे गेला असा प्रश्न ही मनसेने केले आहे. त्यात मारहाण झाल्यानंतर ही आयुक्त गप्प होते. त्यामुळे यात आयुक्तांची भूमीका संशयास्पद आहे. त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत त्यांची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात हलगर्जी पणा केला आहे असाही आरोप करण्यात आला आहे.