KDMC Election: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना (Final Ward Structure) शुक्रवारी (3 ऑक्टोबर 2025) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या घोषणेमुळे आता मतदार याद्या (Voter Lists) तयार करणे आणि प्रभाग आरक्षणाचा (Ward Reservation) कार्यक्रम लवकरच निश्चित केला जाईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिली आहे.
अंतिम प्रभाग रचना कुठे पाहता येईल?
अंतिम प्रभाग रचना केडीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर (Official Website) प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांच्या माहितीसाठी ही रचना नकाशे स्वरूपात महापालिकेच्या मुख्यालयात, सर्व विभागीय कार्यालयांमध्ये आणि 10 प्रभाग कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग प्रारूप रचना (Draft Ward Structure) August 22 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रारूप रचना प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या, ज्यात एकूण 264 हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त हरकती आणि सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत September 11 रोजी सुनावणी घेण्यात आली.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये मशिदीबाहेर तुफान राडा; नमाज पठणावरून दोन गट भिडले! 'हे' होतं कारण )
या सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी आपला अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) सादर केला होता. निवडणूक आयोगाने या अहवालानुसार अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर आज ही रचना केडीएमसीने प्रसिद्ध केली आहे.
प्राप्त हरकतींपैकी किती मान्य?
उपायुक्त मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 264 हरकती सूचनांपैकी 214 हरकती या प्रभागाच्या हद्दी संदर्भातील होत्या. यापैकी 4 हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत. 4 हरकती व्याप्ती संदर्भातील होत्या, ज्या पूर्णतः मान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित 46 हरकती प्रभाग रचनेशी संबंधित नव्हत्या.
अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यामुळे आता निवडणुकीच्या पुढील टप्प्याला सुरुवात होणार असून, लवकरच मतदार यादी तयार करण्याचा आणि प्रभाग आरक्षणाचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाईल.