- केतन अग्रवाल हत्येचा कट होणारी पत्नी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतनने आखला होता.
- सियाने केतनला लोहगडाच्या उंच ठिकाणाहून नेऊन चारशे मीटर खोल दरीत ढकलले होते
- सुरक्षा रक्षक दिनेश पवार आणि इतर कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले होते
सुजाता द्विवेदी/ अक्षय कुडकेलवार
केतन अग्रवाल हत्येत एक एक धुक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागताना दिसत आहे. ज्या पद्धतीने या हत्येचा प्लॅन केला गेला होता, ते पाहात सर्वच जण आवाक झाले आहेत. सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन यांनी निवडलेली जाता ते प्लॅन सक्सेस होईल पर्यंतच्या त्याच्या हालचाली या परफेक्ट प्लॅनिंगचा भाग होता. पण शेवटी एक चुक नडते आणि सर्व प्लॅनवर पाणी फिरले जातेत. तसेच या दोघांबाबतीत झाले. सियाने लोहगडाच्या अतिशय उंच स्पॉटवरून केतनला धक्का दिला. त्यानंतर तिने जे काही केले ते तिथल्याच एक सुरक्षा रक्षक दिनेश पवार यांने सांगितला आहे. तो जे काही सांगत होता त्याने अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही.
18 जूनला केतन आणि सिया लोहगडावर आले होते. तिने त्याला जवळपास 400 मिटर खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर खरा ड्रामा सुरू झाला. तिथं उपस्थित असलेला सुरक्षा रक्षक दिनेश सांगतो, जेव्हा ही घटना झाली त्यावेळी आम्ही थोड्याच अंतरावर होता. त्यावेळी आम्ही ओरडण्याचा आवाज ऐकल्याचं तो सांगतो. त्यानंतर आम्ही सर्व सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पळूत गेलो. त्यावेळी सिया तिथं होती. ती आम्हाला हेल्प हेल्प असं बोलत होती. शिवाय मंदिरा जवळ पडला आहे असं ही ती सांगत होती. आम्ही तिला तिथं रोखलं. तातडीने ही बाब पोलीसांना कळवली. पोलीस चौकी 200 मिटर अंतरावर होती. किल्ल्यावर पोलीसांची 24 तास ड्युटी असते असं ही त्याने सांगितलं. आम्ही ही सुरक्षेसाठी होतो. पण दुर्घटना घडली त्यापासून काही अंतरावर होतो असं तो म्हणाला.
लोहगडावर अनेक वेळा मोबाईल लागत नाही. त्यामुळे संपर्क करण्यात अडचण येते. सिया वारंवार आम्हाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण आमचा फोकस केतनला वाचवण्यावर होता. पोलीसांनी सांगितल्यानंतर पोलीस तिथे तातडीने आले. त्याच वेळी पोलीसांनी ही शिवदुर्ग टेकर्स यांना कल्पना दिली होती. त्यांची टीम ही तिथे पोहोचली होती. असं दिनेश यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर टेकर्स दरीत उतरले. ते केतन जवळ पोहोचले. त्यावेळी केतनचा मृत्यू झाला होता. केतन वाचेल असं ट्रेकर्सना वाटत होतं. कारण त्या भागात मोठ्या प्रमाणात झाडी होती. पण तो डोक्यावर पडला होता. त्याचा मेंदू ही बाहेर आला होता अशी माहिती ही त्याने दिली. त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्याला वाचवण्याची काही संधी नव्हती.
ज्या ठिकाणाहून केतनला धक्का देण्यात आला तो लोहगडावरचा शेवटचा स्पॉट आहे. फार कमी लोक तिथे जातात. तो एक धोकादायक स्पॉट म्हणून ओळखला जातो. इथं एक अवघड चढाई करून यावं लागतं. जवळपास त्यासाठी एक तास लागतो. त्यासाठी चारशे ते साडेचारशे शिड्या चढाव्या लागतात. त्यानंतर एक छोटी ट्रेक करावी लागते. शिवाय या ठिकाणी फार कमी पर्यटक असतात. त्यामुळे ज्यावेळी केतनला धक्का मारला गेला त्यावेळी तिथे कोणी नव्हते. असाच स्पॉट शोधण्यात आला होता. ही घटना घडल्यानंतर सर्वच जण हादरले होते. शिवाय तिथल्या सुरक्षा रक्षकांची ही यावेळी धावपळ उडाल्याचं दिनेश यांनी यावेळी सांगितलं.