- लोहगडावरून कोसळलेल्या केतन अग्रवाल यांच्या मृत्यूचा अपघात नव्हता, तर नियोजनबद्ध हत्या होती
- केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी ही हत्या केली
- सियाने वाढदिवसाच्या दिवशी केतनला लोहगडावर नेऊन चेतनच्या मदतीने त्याला दरीत ढकलले होते
Pune Lohagad Murder: लोहगडावरून कोसळून केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचं सुरूवातील दाखलण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात हा अपघात नव्हता. पोलीसांना या घटनेबाबत संशय आला होता. शिवाय केतन हा चांगला ट्रेकर होता अशी माहिती त्याच्या कुटंबीयांनी दिली होती. त्याच वेळी पोलीसांच्या मनात ही संशय दाटला. पण ज्यावेळी याचा शोध सुरू केला त्यावेळी एक गोष्ट पोलीसांना खटकली आणि संपूर्ण केस 380 डिग्रीमध्ये फिरली. एक क्लू पोलीसांसाठी महत्वाचा ठरला आणि या धक्कादायक खूनचा उलगडा झाला.
पोलीस अधिकारी संदीप सिंग गिल्ल यांनी या हत्येच्या पार्श्वभूमिवर पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. त्यात त्यांनी एकएक गोष्टी उलगडून सांगितली. हा अपघात नव्हता तर ही एक नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हत्या होती असं त्यांनी सांगितलं. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल या हत्येची मुख्य सुत्रधार होती. त्यासाठी तिला तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांने सहकार्य केल्याचे ही तपासात समोर आले आहे. सिया आणि चेतन यांचे अनैतिक संबंध होते. त्यात तिचे लग्न केतन सोबत ठरले होते. ते तिला मान्य नव्हते. केतन हा मोठ्या बांधकांम व्यावसायिकाचा मुलगा आहे. तर सिया ही मोठा मसाले विक्रेत्याची मुलगी होती.
तिच्या दुकाना शेजारीच या चेतनचे दुकान होते. तिथेच त्यांचे प्रेम झाले आणि नाते पुढे गेले. मात्र तिचे लग्न ठरल्याने दोघे ही अस्वस्थ होते. त्यातूनच या दोघांनी केतनचा खून करण्याचा प्लॅन केला. पोलीस तपासात ज्या गोष्टी समोर आल्या त्यानुसार सियाने आपल्या वाढदिवसा दिवशी लोहगडावर जाण्याचा प्लॅन केला. त्यासाठी तिने केतनला यायला सांगितले. त्याच वेळी तिने चेतनला ही सोबत घेतलं होतं. चेतन त्या दोघांचा पाठलाग करत होता. सिया त्याला एका खतरनाक कठड्यावर घेवून गेली. तिथेच सिया आणि चेतनने त्याला धक्का दिला. तिथून तो थेट पाचशे फुट खोल दरीत कोसळा. तिथेच त्याचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Pune News : सह्याद्रीच्या कुशीत सेलिब्रेशन; भयंकर घडलं अन् वाढदिवशीच निघाली अंत्ययात्रा!)
सुरूवातीला हा अपघात वाटत होता. तसा सिन ही सिया हिने उभारला होता. पण केतन हा चांगला ट्रेकर होता त्याच्यासोबत काही तरी चुकीचं झालं असावं असा संशय केतनच्या कुटुंबियांनी व्यक्त केला. त्यानंतर पोलीसांनी आपली सुत्र हलवली. मोबाईल लोकेशन आणि सीडीआर काढण्यात आले. त्यावेळी संशयाची सुई सियाकडे गेली. त्यानंतर पोलीसांनी लोहगडावरील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी त्यांना या संपूर्ण प्रकरणाचा खरा छडा लागला. सीसीटीव्हीमध्ये सियाचा बॉयफ्रेंड चेतन दिसत आहे. पण चेतन ज्या पद्धतीने दिसला त्यामुळे पोलीसांचा संशय आणखी बळावला. पोलीसांनी याबाबत खुलासा केला.
ज्या दिवशी सिया आणि केतन लोहगडावर गेले होते त्यावेळी मोठ्या प्रमाणात उन होते. प्रचंड उकाडा होता. त्याच वेळी सियाचा बॉयफ्रेंड चेतन हा हुडी घालून गेला होता. इतक्या उन्हात त्याने केवळ तोंड झाकण्यासाठी ही हुडी घातली होती. डोळ्यावर गॉगल लावला होता. कानात हेडफोन घातले होते. त्यातून तो आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी पोलीसांचा संशय पक्का ठरला. त्यांनी या दोघांना ही ताब्यात घेतले. पोलीसांनी चौकशी केल्यानंतर या दोघांनी ही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेनं पोलीस ही हादरले आहेत. शिवाय केतनचे कुटुंब ही शॉकमध्ये आहे. आपल्याला गोयल कुटुंबाने फसवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सिया आणि केतनचं जयपूरला लग्न होणार होते. त्यासाठी 15 कोटी देवून महल बुक करण्यात आला होता. दोन विमान ही बुक केली होती पण या सर्वावर सियाने आपल्या क्रुर कृतीने पाणी सोडले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world