Raigad News : महाराष्ट्राच्या नेतेमंडळींची झोप उडवणारा व्हिडीओ! खालापूरमधील महिलेची अंगावर काटा आणणारी कहाणी

देशासह महाराष्ट्रात 'विकास' झालाय असा ढिंडोरा पिटणाऱ्या लोकप्रतिनिंधीनीची झोप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Khalapur Delivery Woman Video Viral

मेहबूब जमादार, प्रतिनिधी 

Raigad Viral Video : देशासह महाराष्ट्रात 'विकास' झालाय असा ढिंडोरा पिटणाऱ्या लोकप्रतिनिंधीनीची झोप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.शहरी भागात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचणारे नेतेमंडळी कधीतरी ग्रामीण भागाचाही विकास करतील, अशी आशा गावातील लोक उराशी बाळगून असतात.परंतु, काही ठिकाणी विकास तर सोडाच,लोकांना आवश्यक असणार्‍या सामान्य गोष्टींचीही वानवा आहे.

रुग्णालयापर्यंतचा खडतर प्रवास सर्वांना थक्क करणारा

अनेक ग्रामिण भागात गर्भवती महिलांना वेळेवर रुग्णालयात पोहोचता येत नाही. डोंगरमाथ्यावर राहणाऱ्या आदिवासी वस्त्यांपर्यंत आजतागायत रस्तेही पोहोचले नाहीत. त्यामुळे येथील लोक गर्भवती महिलांना झोळीत नेत रुग्णालयापर्यंतचा खडतर प्रवास करतात.असाच एक धक्कादायक व्हिडीओ खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडीतून समोर आला आहे.

Advertisement

इथे पाहा काळीज पिळवटून टाकणारा व्हायरल व्हिडीओ

खालापूर तालुक्यातील चौक जवळील जंगल दऱ्या खोऱ्यातील आणि दुर्गम भागातील उंबरणेवाडीतील हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.व्हिडीओत पाहू शकता की एका गर्भवती महिलेला चक्क झोळीतून सहा किलोमीटरचाी पायीपीट करत नेलं. गावकरी जवळच्या आंबेवाडीत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी वाहनाने 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या चौक ग्रामीण रुग्णालयात महिलेला उपचारासाठी दाखल केलं.