Pahalgam Attack Terrorist Attack NIA Chargsheet : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयए (NIA) चार्जशीटमधून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. ज्यामुळे संपूर्ण घटनाक्रमाचा प्लॅन,दहशतवाद्यांची तयारी,मदत करणाऱ्या स्थानिकांची भूमिका आणि सुरक्षा दलाच्या ऑपरेशनबाबतच्या सविस्तर माहितीचा समावेश आहे.तपास यंत्रणांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये हल्ल्यात सहभागी झालेल्या तिन्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या फोटोलाही रेकॉर्डमध्ये सामील केलं. हे सर्व दहशतवादी सुरक्षा दलांकडून राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन महादेव'मध्ये मारले गेले.
चार्जशीटच्या माहितीनुसार,फैजल जट्ट उर्फ सुलेमान,हमजा अफगानी आणि हबीब ताहिर उर्फ जिब्रान भाई,अशी हल्ल्यात सामील झालेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. तपास यंत्रणांनी दावा केला आहे की,हे तिन्ही दहशतवादी पाकिस्थानच्या दहशतवादी नेटवर्कसोबत जोडले गेले होते. त्यांनी आधीच पहलगाम परिसराची रेकी केली होती. तसच रस्ते आणि स्थानिक मदतीचं सर्व इनपूट देण्यात आलं होतं. या चार्जशीटमध्ये दहशतवाद्यांचं जिवंत असतानाचा फोटो आणि चककमी दरम्यानचे फोटोही लावण्यात आले आहेत.फोटोत दहशतवाद्यांच्या डोक्याला आणि शरीराला गोळी लागल्याचे निशाण स्पष्ट दिसतात.
नक्की वाचा >> Pune News: पुणेकरांनो अलर्ट राहा, 'या' 4 ठिकाणी पावसाने घातला धुमाकूळ, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
दहशतवाद्यांनी त्या परिसरात अनेक दिवस रेकी केली
चार्जशीटमध्ये दोन स्थानिक लोक-बशीर अहमद आणि परवेज अहमदला दहशतवाद्यांचा हस्तक म्हटलं गेलं आहे.एनआयएचा आरोप आहे की,या दोघांनी दहशतवाद्यांना फक्त सुरक्षीत जागाच दिल्या नाहीत, तर परिसरातील रस्ते आणि संभाव्य टार्गेटची माहिती देण्यात मदत केली. एनआयने त्यांच्या चार्जशीटमध्ये दोन्ही आरोपींचे फोटोही समाविष्ट केले आहेत. पैसे आणि लोभापोटी त्यांनी देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवला. दहशतवाद्यांनी त्या परिसरात अनेक दिवस लपून रेकी केली.यादरम्यान स्थानिक नेटवर्कने त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत केली.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 34 कोटींची ब्राऊन शुगर जप्त, पठाण गँगच्या म्होरक्याला अटक
चार्जशीटमध्ये सर्वात मोठा खुलासा दहशतवाद्यांची हालचाल आणि ट्रेकिंग रुटबाबत करण्यात आला आहे. हल्ल्याच्या दिवशी दहशतवाद्यांनी बैसरन घाटीपर्यंत पोहोचण्यासाठी सामान्य रस्त्याचा वापर केला नव्हता. ते अनेक किमीपर्यंत डोंगर आणि जंगलातील अवघड ट्रेकिंग रूट म्हणजेच दरीपर्यंत पोहोचले होते. जेणेकरून स्थानिक लोक आणि सुरक्षा दलाच्या नजरेतून वाचू शकतील.