
gokul milk kolhapur : आज गोकुळ दूध संघाच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या आणि इतर संचालकांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. सुरुवातीला शांततेत सुरू झालेल्या सभेत शेवटच्या टप्प्यात राडा झाल्याचं समोर आलं आहे.
दरवर्षी गोकुळ संघाच्या वार्षिक सभेच्या सुरुवातीला गोंधळ होत असतो. मात्र यंदा सभा शांततेत सुरू झाली आहे. विरोधी गटातील संचालिका शौमिका महाडिक यांनी सभासदांमध्ये बसणं पसंत केलं. सभेसाठी मंत्री हसून मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, के.पी. पाटील हे देखील सभासदांमध्ये उपस्थित होते.
2 प्रोडक्ट लाँच करणार (Gokul Sangh will introduce 2 new products)
या सभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गोकुळने थेट अमूलला आव्हान दिलं आहे. सध्या बाजारात गोकूळच्या अनेक प्रोडक्टचा समावेश आहे. यामध्ये गोकुळचे दूध, दही, बटर, ताक, श्रीखंड, बासुंदी, लस्सी, आम्रखंड, तूप, पनीर, फ्रूटखंड, फ्लेवर्ड दूध आणि गोकूळ पेढा यांचा समावेश आहे. मात्र लवकरच गोकूळ चीज आणि आईस्क्रीमचे प्रोडक्ट लाँच करणार आहे. याबाबत गोकूळ संघाच्या सर्वसाधारण सभेत घोषणा करण्यात आली.
नक्की वाचा - Benefits Of Milk and Honey: दूध आणि मध एकत्रित प्यायल्यास काय होईल? शरीरातील या समस्यांमध्ये दिसेल का फरक
गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज आहे. या सभेला विरोधी संचालिका शौमिका महाडिक काय भूमिका घेणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं. कारणं गेल्या चार वर्षात शौमिका महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेत व्यासपीठा खालून सभासदांचे प्रश्न मांडले होते. सत्ताधाऱ्यांना कडाडून विरोध करत धारेवर धरलं होतं. मात्र आता विद्यमान अध्यक्ष महायुतीचे झाल्याने त्यांनी शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर बसण्यासाठी विनंती केली आहे. मात्र या सभेत संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यासपीठावर बसणं टाळलं. महाडिक यांनी सभासदांसोबत बसण्याला प्राधान्य दिलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world