Konkan Railway : रेल्वेचं तिकीट मिळत नाही? शिमग्यानिमित्त विनाआरक्षित मेमू ट्रेन धावणार, थांबा कुठे?

शिमग्यासाठी कोकणात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Memu Train for Konkan for Shimgaya : शिमगा सणासाठी मोठ्या संख्येने लोक ठाणे-मुंबई-पुण्याहून कोकणात येतात. कोकणात यादिवशी मोठा उत्साह असतो. कोकणात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिव्याहून चिपळूणपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर राखीव नसलेली मेमू ट्रेन चालवली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही तिकीट बुक न करता थेट ट्रेनने प्रवास करू शकता. ही मेमू स्पेशन ट्रेन १ मार्च ते ८ मार्च २०२६ पर्यंत दोन्ही मार्गावर धावेल. 

शेड्यूल आताच नोंदवून घ्या...

शिमगा महोत्सवासाठी बरेच जणं मुंबई आणि ठाण्याहून कोकणात जातात. त्यामुळे कोकणला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आरक्षित तिकीट मिळणं कठीण जातं. अशावेळी राखीव नसलेल्या ट्रेन सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ही मेमू ट्रेन नंबर ०११५९ दिवा स्टेशनहून रात्री ११.२५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूनला पोहोचेल. ट्रेन नंबर ०११६० चिपळूनहून दुपारी ३.३० वाजता निघेल आणि रात्री ११.१० वाजता दिव्यात पोहोचेल. 

नक्की वाचा - Konkan News : कोकणात फिरायला जाताय? आपत्ती व्यवस्थापनाने केलंय अलर्ट, या चुका अजिबात करू नका

MEMU ट्रेनचे हे असतील थांबे...

ही ट्रेन दिवा, निलजे, तलोजे, कलंबोली, पनवेल, सोमठाणे, अप्टा, जीते, पेण, कासू, नागोथाने, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगांव रोड, वीर, सापे वामने, करंजडी, विन्हेरे, दीवानखावटी, कलंबनी बुद्रुक, खेड़, अंजनी आणि चिपळूनसारख्या अनेक स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. या ट्रेनमध्ये राखीव जागा नसल्यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करणं सोपं होईल. यादरम्यान रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि मडगाव जंक्शनदरम्यान स्पेशन ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 


मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस...

ट्रेन नंबर ०१००४ मडगाव जंक्शनहून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी सायंकाळी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन १ ते ८ मार्चपर्यंत सुरू असेल. याशिवाय ट्रेन नंबर ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव जंक्शनदरम्यान एक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येईल. ही ट्रेन २ मार्च ते ८ मार्चपर्यंत दररोज सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. 

Advertisement