Konkan Railway App: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खास अ‍ॅप! काय काय सुविधा मिळणार?

konkan Railway App: विशेषतः गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आणि डिसेंबरमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रवासादरम्यान त्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Konkan Railway App: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ‘के-एअर मिरर' नावाचे एक नवीन मोबाइल ॲप सुरू केले आहे. या ॲपमुळे प्रवाशांना कोकण रेल्वेची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध होणार आहे. हे ॲप मराठीसह आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना विविध प्रकारची माहिती मिळू शकेल.

प्रवाशांना कसा होईल फायदा?

  • सध्या धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची सद्यस्थिती आणि वेळापत्रक जाणून घेता येईल.
  • रेल्वेमधील केटरिंग सेवा आणि महिला प्रवाशांसाठीच्या खास सुविधांची माहिती.
  • कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती.
  • कोकण रेल्वेचा इतिहास, मैलाचे दगड आणि विविध प्रकल्पांची माहिती.
  • प्रवाशांना सुरक्षा आणि जनजागृतीसाठी आवश्यक मोहीम राबवली जात आहे.

हे ॲप कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाशी लिंक असल्याने, सर्व माहिती अधिकृत आणि विश्वसनीय आहे.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे हायवेवर कशी होतेय फसवणूक? हा Insta Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)

ॲप सुरू करण्यामागचे कारण

विशेषतः गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आणि डिसेंबरमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रवासादरम्यान त्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

याशिवाय, कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सावंतवाडी अशी साप्तहिक रेल्वे सेवा 10 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी अधिक सोयीचे होईल. कोकण रेल्वेचे ‘के-एअर मिरर' ॲप वापरण्यास अत्यंत सोपे आणि सोयीस्कर आहे, असेही सांगण्यात आले आहे.

Topics mentioned in this article