Mary Dog : अवघ्या 4 मिनिटात केस सोडवली; 6 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मॅरीची मोठी कामगिरी

मॅरीने घटनास्थळावरील मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्यामुळे मॅरीला १० हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mary the dog solved the rape case : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे डॉग स्क्वॉडमधील मॅरीने एक महत्त्वाची केस सोडवली आहे. त्यामुळे तिचं मोठं कौतुक केलं जात आहे. मॅरीने घटनास्थळावरील मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्यामुळे मॅरीला १० हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. 

मॅरीने सोडवली बलात्काराची केस...

ही घटना उत्तर प्रदेशातील संभलमधील आहे. १८ जूनच्या सायंकाळी गावातील एका ६ वर्षीय मुलगी घराच्या बाहेर खेळत होती. खेळता-खेळता ती घरापासून काही अंतरावर निघून गेली आणि बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र तिचा शोध लागला नाही. सायंकाळी उशीरा गावकऱ्यांना चिमुरडी घरापासून साधारण २०० मीटर अंतरावरुन तलावाच्या किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली. यानंतर कुटुंबीय तिला तातडीने आरोग्य केंद्रावर घेऊन गेले. शुद्धीवर आल्यानंतरही तिला नेमकं काय घडलं हे सांगता येत नव्हतं. येथे प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठविण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मुलीची प्रकृती अधिक बिघडली. यानंतर तिला जवळच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आलं. यावेळी चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

Advertisement

पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमला एक गमछा सापडला. यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य शोध घेण्यात आला, मात्र ठोस पुरावा मिळू शकला नाही. यानंतर पोलीस अधिक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांच्या आदेशानंतर डॉग स्क्वॉडच्या टीमला बोलावण्यात आलं. यावेळी डॉग स्क्वॉडची प्रशिक्षित मॅरीने घटनास्थळावरुन गमछ्याचा वास घेतला आणि थेट पानवारी गावातील रहिवासी संदीपच्या घरापर्यंत पोहोचली. यानंतर पोलिसांना नेमका प्रकार लक्षात आला. त्यांनी घरात डोकावून पाहिलं, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. दुसऱ्या दिवशी सोमवारी एका चेकिंग अभियानादरम्यान पोलिसांना संदीप दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यादरम्यान संदीप आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. शेवटी संदीपच्या पायाला गोळी लागली आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

मॅरीला केलं सन्मानित...

या रेप प्रकरणातही अवघ्या तीन ते साडे तीन मिनिटात मॅरीने आरोपीचा शोध घेतला. याचा एक व्हिडिओही आता समोर आला आहे. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका निभावणारी डॉग स्क्वॉडच्या मॅरीला अधिक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी १० हजार रुपयाच्या पुरस्काराने सन्मानित केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरी आपल्या बॅचची गोल्ड मेडलिस्ट आहे आणि २०१९ पासून जनपद संभलमध्ये सेवा देत आहे. मॅरीने यापूर्वी हत्या, चोरी आणि अन्य गंभीर गुन्हे प्रकरणं सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रकरणांमध्ये तिचं प्रसंगावधान आणि वास घेण्याच्या क्षमतेमुळे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचविण्यात निर्णायक योगदान दिलं आहे. 

Topics mentioned in this article