Ladki Bahin Yojana E- KYC: 'लाडकी बहीण' E-KYC ला 43 दिवसांची मुदतवाढ, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Ladki Bahin Yojana E- KYC date extended: विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ladki Bahin Yojana E- KYC:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती तसेच अनेक महिलांनी अनेक समस्या उपस्थित केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-केवायसी करण्याचा 18 नोव्हेंबरपर्यंत होता. आता त्याची मुदत वाढवून 31 डिसेंबरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे.

तसेच, ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत, अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी केले आहे.

(नक्की वाचा-  Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)

ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

  • लाभार्थींनी त्यांच्या मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
  • पोर्टलवर लॉगिन केल्यावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपला आधार क्रमांक  आणि Captcha Code योग्य ठिकाणी टाका.
  • आधार प्रमाणिकरणासाठी परवानगी देऊन 'Send OTP' या पर्यायावर क्लिक करा. 
  • आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाईप करा. 
  • यानंतर, पती/वडिलांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नमूद करून त्यांची OTP प्रक्रिया पूर्ण करा.
  • लाभार्थी भगिनीचा जात प्रवर्ग निवडा.
  • आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर  क्लिक करून संपूर्ण माहितीची एकदा पडताळणी करावी आणि 'Submit' बटण क्लिक करावे.
  • 'e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली' असा संदेश स्क्रीनवर दिसल्यास प्रक्रिया पूर्ण झाली समजावी.

ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि फोटो.
  • रेशन कार्ड  आणि उत्पन्नाची माहिती.
  • डोमासाईल किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल.
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास, पतीचे वरीलपैकी कोणतेही (१५ वर्षांपूर्वीचे) अधिवास सिद्ध करणारे कागदपत्र लागेल. 
  • वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल. 
  • बँक खाते तपशील (Bank Account Details) आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र.
Topics mentioned in this article