अनेक अडचणी, मिरवणुकीला झालेला उशीर यानंतर अखेर चंद्रग्रहणाला काही मिनीटे शिल्लक असताना लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. तब्बल 33 तासानंतर हे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी पोहोचलेल्या लालबागच्या राजाच्या तराफ्यात अडचणी निर्माण झाल्या. शिवाय भरती ओहटीची वेळही चुकली. त्यामुळे काही काळ विसर्जनासाठी प्रतिक्षा करावी लागली अशी स्थिती निर्माण झाली. शेवटी 33 तासानंतर लालबागच्या राजचे गिरगाव चौपाटीवर अरबी समुद्रात विधीवत विसर्जन करण्यात आले. त्याआधी आरती ही करण्यात आली.
तब्बल 33 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले आहे. रात्री जवळपास 9 वाजता विसर्जन करण्यात आले आहे. भरती येण्यापूर्वी लालबागच्या राजाला विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचणे गरजेचे होते. पण ती वेळ चुकली. त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाची प्रतिक्षा भाविकांना करावी लागली. विसर्जन रखडल्याची स्थिती निर्माण झाली होती. सकाळी विसर्जनाचा प्रयत्न करण्यात आला होता. पण समुद्रात पाणी खूप असल्याने तो विसर्जनाचा प्रयत्न फसला होता.
पुढे ओहोटी आल्यानंतर आधुनिक तराफ्यावर लालबागचा राजा ठेवण्यात आला. पण तराफा विसर्जनासाठी नेण्यास पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे भरतीची वाट पाहण्या शिवाय कोणताच पर्याय राहीला नाही. शेवटी चंद्रग्रहण सुरु होण्यास काही मिनिटे शिल्लक असताना लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. खरं तर ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर ठेवला जातो. त्यानंतर भरतीच्या वेळी तराफ्यावरुन विसर्जन केले जाते.
पण लालबागच्या राजाची मिरवणूक भरती सुरु झाल्यानंतर गिरगाव चौपाटीवर आली होती. विसर्जन स्थळी लालबागच्या राजाला पोहोचण्यासाठी जळपसा पंधरा ते वीस मिनिटांचा उशिर झाला होता. त्यामुळे पुढील सर्व गणित बिघडली होती. यामुळे दिवसभर विसर्जनाची वाट पहावी लागली. यानंतर साडे आठ-नऊच्या सुमारास पुन्हा भरती सुरु झाली. स्वयंचलित तराफा पाण्यात जाण्यासाठी तयार झाला. अखेर नऊ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. यानिमित्ताने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उटत आहे. लालबाग राजा गणेश मंडळावर टीकेची झोड सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.