खड्ड्यात पडून झालेल्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण? चौकशी अहवालातून सत्य बाहेर आले

परिमंडळ 3 चे उपायुक्त देविदास क्षीरसागर मुख्य अग्निशमन अधिकारी  रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ या तिघांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईमध्ये 25 सप्टेंबर 2025 रोजी मुसळधार पाऊस पडला होता. या पावसात अंधेरीतील सीप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेलचा दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केला आहे. सदर घटनास्थळ व परिसर हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) चे कंत्राटदार एल ऍण्ड टी यांचे ताब्यात असल्याने त्याठिकाणी असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एल ऍण्ड टी तसेच एमएमआरसीएल यांची असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला आहे. 

मुंबईत बुधवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामध्ये खड्ड्यामध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. सदर प्रकरणाची दखल घेत महापालिकेने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने सदर घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आला.  

Advertisement

अहवालातील निष्कर्षानुसार, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ते स्थळ व सभोवतालचा परिसर 2015 पासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) चे कंत्राटदार एल ऍण्ड टी यांच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी मध्ये आढळलेल्या त्रुटी कंत्राटदार एल अँड टी यांना कळवल्या होत्या. त्यावर, दोष दायित्व कालावधी (DLP) मध्ये महानगरपालिकेला काही त्रुटी आढळल्यास त्यांची पूर्तता करण्यास बांधील आहे,  असे एल अँड टी यांना दिनांक 24 ऑगस्ट 2024 व 29 ऑगस्ट 2024 च्या पत्राद्वारे एमएमआरसीएल यांना सादर केले होते. एकूणच, दुर्घटनेच्या ठिकाणांच्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एमएमआरसीएलचे कंत्राटदार एल ऍण्ड टी व एमएमआरसीएल यांची आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे असे महापालिकेने कळवले आहे. 

Advertisement

महापालिकेने म्हटले आहे की, दुर्घटना घडली तो रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने व अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) घोषित असताना महानगरपालिकेच्या विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी दक्ष राहणे आवश्यक होते. परिमंडळ 3 चे उपायुक्त देविदास क्षीरसागर मुख्य अग्निशमन अधिकारी  रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ या तिघांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. 

Advertisement
Topics mentioned in this article