2 days ago

Latest News Updates : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पहिलीपासून हिंदी भाषेव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांचेही पर्याय उपलब्ध करून देण्याची शिफारस अभ्यासक्रम आराखडा सुकाणू समितीने केली होती. मात्र, ही शिफारस डावलून शिक्षण विभागाने हिंदीची सक्ती केल्याचे सूत्रांनी सांगितलं. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) मात्र अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीची मंजुरी असल्याचे सांगितले. 

Apr 18, 2025 19:11 (IST)

LIVE Updates: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न 

महाराणा प्रताप यांचे वंशज लक्षराज सिंह मेवाड नरेश यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार रावल, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची उपस्थिती 

18 फूट उंची असलेल्या पुतळ्याला राजनाथ सिंह यांच्याकडून अभिवादन 

थोड्याच वेळात कॅनॉट गार्डन येथे आयोजित सभेला करतील संबोधित

Apr 18, 2025 19:01 (IST)

LIVE Updates: महागाईचा निषेध! डोंबिवलीत ठाकरे गटाचे चूल पेटवून आंदोलन

वाढती महागाई आणि गॅस दर वाढीच्या विरोधात डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.  स्टेशन परिसरात चुलीवर भाकरी भाजून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Apr 18, 2025 17:28 (IST)

Live Update : नॅशनल हेराल्ड प्रकरण! पुण्यात भाजप- काँग्रेस आमनेसामन

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजप आक्रमक 

पुण्यात काँग्रेस भवन च्या समोर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार आहे 

काँग्रेस भवन बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त 

बालगंधर्व रंगमंदिरापासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे 

थोड्याच वेळात भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेस भवनावर धडकणार आहेत

तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त 

दुसरीकडे काँग्रेस भवन मध्ये काँग्रेस कार्यकर्ते देखील जमण्यास सुरुवात 

Apr 18, 2025 16:41 (IST)

LIVE Updates: हिंदी भाषा सक्तीविरोधात रत्नागिरीतही मनसे आक्रमक

नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात आता पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची केली जाणार आहे. याला मनसेने जोरदार विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे.. रत्नागिरीतही मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची होळी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रत्नागिरीतील मनसेच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. मराठीची गळचेपी होऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला..

Advertisement
Apr 18, 2025 16:39 (IST)

Pune News: तोडफोड करणाऱ्या आरोपींना पोलिसांचा दणका , भरचौकातून काढली धिंड

शहरात गाड्या तोडफोड करणाऱ्या आरोपींना पोलिसांचा दणका 

कोंढवा परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या आरोपींना 12 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

पुणे पोलिसांकडून आरोपांची धिंड 

ज्या ठिकाणी गाड्यांची केली तोडफोड त्याच ठिकाणी नेत पोलिसांनी आरोपींना घडवली अद्दल 

दोन दिवसांपूर्वी पुन्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपींकडून हातात कोयते घेत गाड्यांची करण्यात आली होती तोडफोड

Apr 18, 2025 16:38 (IST)

Pune News: खडकी रेल्वे स्थानकात युवक काँग्रेसकडून रेल्वे रुळावर आंदोलन

खडकी रेल्वे स्थानकात युवक काँग्रेसकडून रेल्वे रुळावर आंदोलन 

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरली पुणे लोणावळा रेल्वे 

नॅशनल हेरॉईड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिषीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने खडकी रेल्वे स्थानकावर केलं आंदोलन

Advertisement
Apr 18, 2025 13:50 (IST)

Pune News: भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील दीड महिने बंद

पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील दीड महिने बंद राहणार आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेला पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक पुढील दीड महिने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मत्र मोठी गैरसोय होताना दिसते आहे. पुण्यातील नारायण पेठ सदाशिव पेठ या भागातून तसेच उपनगरातून आजारांच्या संख्येने वाहन याच भिडे पुलावरून दररोज या जा करतात त्यामुळे वाहतूक शाखेला हा पूल बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग देण्याचं मोठं आवाहन उभे ठाकले आहे

Apr 18, 2025 12:41 (IST)

अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेचं पुण्यात आंदोलन

अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे.  बालगंधर्व चौकात आंदोलन. राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा केला आहे.  काल राज ठाकरेंनी या बद्दलची भूमिका जाहीर केल्यानंतर आज मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने काढलेल्या GR ची होळी केली जाणार.

Advertisement
Apr 18, 2025 12:32 (IST)

Nashik Violence : नाशिक शहरात उद्यापासून 15 दिवस मनाई आदेश लागू

नाशिक शहरात उद्यापासून 15 दिवस मनाई आदेश लागू 

पखाल रोड परिसरात घडलेला हिंसाचार, राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आदेश लागू

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला निर्णय

मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन, रास्ता रोको अथवा निदर्शनं करता येणार नाही

मनाई काळात स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई

मनाई कालावधीत प्रतीकात्मक चित्रं, पुतळ्याचे दहन, घोषणा देणं , आक्षेपार्ह वक्तव्य करण्यास देखील सक्त मनाई

Apr 18, 2025 11:53 (IST)

एका पिस्टलसह 20 ग्रॅम एमडी ड्रग्स घेतलं ताब्यात, सोलापूरच्या बार्शी शहर पोलिसांची मोठी कारवाई

धाराशिव येथील ड्रग्स प्रकरण ताजे असतानाच बार्शीत ड्रग सापडल्याने खळबळ

एका पिस्टलसह 20 ग्रॅम एमडी ड्रग्स घेतलं ताब्यात 

बार्शी जवळील परांडा रोड येथे तिघाांना ताब्यात घेतलं

सोलापूरच्या बार्शी शहर पोलिसांची मोठी कारवाई 

Apr 18, 2025 11:52 (IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीचा फटका राज्यपाल यांनाही

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीचा फटका राज्यपाल यांनाही 

मुंबईहून पुणे दिशेला जाणारे राज्यपाल राधाकृष्णन त्यांचा ताफा मुंबई-पुणे जुन्या हायवेने पुण्याकडे

राज्यपाल राधाकृषन हे मुंबई पुणे राष्ट्रीय क्रमांक 4 (जुना हायवे ) खोपोली हद्दीतून जाताना खोपोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गांवर खालापूर टोल नाका ते खंडाळा मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी आहे.

Apr 18, 2025 10:32 (IST)

PSI रणजित कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी कासले यांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११(२)(ब) अंतर्गत सेवेतून बडतर्फ केले आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी बीड पोलिसांनी त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक २१३/२५ अंतर्गत, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(र) अन्वये ताब्यात घेतले आहे.

Apr 18, 2025 10:17 (IST)

स्वारगेट अत्याचार प्रकरणातला समरी रिपोर्ट समोर

स्वारगेट अत्याचार प्रकरणातला समरी रिपोर्ट  समोर

आरोपी दत्तात्रय गाडे याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची होती सवय 

पुणे पोलिसांनी जी मेलवरून डाटा केला रिकव्हर 

यामध्ये अनेक वेळा तो पॉर्न साईटवर व्हिडिओ पाहत असल्याचं झाल निष्पन्न

 तसेच दत्तात्रय गाडे हा लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे अहवाल

893 पानांच दोषारोपपत्र दत्तात्रय गाडे विरोधात करण्यात आल आहे दाखल

Apr 18, 2025 09:49 (IST)

नाशिक हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर

नाशिक हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर 

आरोपींची धरपकड सुरू असून आतापर्यंत 38 जणांना अटक

हिंसाचार प्रकरणी पॉलिटिकल कनेक्शन उघड झाल्याने चर्चेचा विषय

एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला ठोकण्यात आल्या बेड्या

गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित आरिफ हाजी झाले नॉट रिचेबल

Apr 18, 2025 08:54 (IST)

नाशिकच्या पखाल रोड हिंसाचार प्रकरणी MIM चे शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक

नाशिकच्या पखाल रोड हिंसाचार प्रकरणी MIM चे शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक

 जवळपास 1500 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला  

आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न केले आहेत 

Apr 18, 2025 08:45 (IST)

बुलडाण्यात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 35 जण जखमी

बुलडाण जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग 56 वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ पहाटे 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली. या अपघातात जवळपास 35 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  10 जखमीना पुढील उपचारासाठी बुलडाणा रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. भाविक आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक, शिर्डीला देवदर्शानासाठी जात होते. तीन दिवस अगोदर देखील याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्यप्रदेश परिवहनची बस व विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन 3 जण ठार तर 18 जण जखमी झाले होते

Apr 18, 2025 08:41 (IST)

बीडचे निलंबित पीएसआय रणजीत कासले बीड पोलिसांच्या ताब्यात

निलंबित पीएसआय रणजीत कासले याला बीड पोलिसांनी घेतल ताब्यात

पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेला घेतलं ताब्यात 

काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यात होता मुक्कामी 

पुणे विमानतळावर काल रणजीत कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते 

पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजीत कासले यांनी सांगितलं होतं

मात्र आज पहाटे रणजीत कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कसलेला घेतलं ताब्यात

Apr 18, 2025 08:13 (IST)

कोल्हापुरसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याना उष्णतेचा यलो अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण चांगलेच वाढले असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा जबर तडाखा जाणवतोय. गुरुवारी कमाल तापमानात दोन अंशांची घट झाली. मात्र भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याना रविवारी उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी 40 अंश पर्यंत पोहोचलेलं तापमान सध्या 37.1 अंश इतकं आहे. यलो अलर्टमूळे कमाल तापमान पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. विजांसह वादळी वाऱ्यांचा इशाराही दिला गेला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Apr 18, 2025 07:59 (IST)

एलईडी मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील दोन नौकांवर मालवणमध्ये कारवाई

महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने करवाई केली आहे. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ६५ खलाशी आहेत. तर अंदाजे ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर नौकांना ५ ते ६ लक्ष दंड होण्याची शक्यता आहे.

Apr 18, 2025 07:36 (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक 

सकाळी 11 वाजता  राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर पार पडणार ही बैठक 

या बैठकीत मुंबई ठाणे, पालघर सरचिटणीस,  पदाधिकारी नेतेमंडळी राहणार उपस्थित

Apr 18, 2025 07:35 (IST)

26 एप्रिलपासून नाशिक जिल्ह्यात पंप चालक CNG ची विक्री करणार बंद

 CNG चा पुरवठा सुरळीत होत नसल्याने  ग्राहकांपाठोपाठ पेट्रोल पंप चालकही वैतागले 

 MNGL कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने पंप चालकांनी दिला बंदचा ईशारा

 रोज निदान दहा तास सुरळीत CNG पुरवठा न झाल्यास 26 एप्रिल पासून नाशिक जिल्ह्यात पंप चालक CNG ची विक्री करणार बंद

नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनचा निर्णय

Apr 18, 2025 07:25 (IST)

नाशिकच्या येवल्यात पाणीटंचाईच्या झळा, तीन ऐवजी चार दिवसांनी होणार पाणीपुरवठा

उन्हाच्या तीव्र झळांमुळे नाशिकच्या येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणीसाठा कमी झालेला आहे. काही दिवसापूर्वी पालखेड धरणातून कालव्याद्वारे तलावात पाणी घेण्यात आले. मात्र तेही पुरेसे न मिळाल्याने पुढील आवर्तन थेट जून महिन्यात मिळणार असल्याने परिणामी नगरपालिका प्रशासनाला शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करावी लागली असून तीन दिवसांऐवजी आता तो चार दिवसाआड करण्यात येणार आहे. पाणी टंचाईची परिस्थिती पाहता नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात येत आहे.