लवासात भूस्खलन, पावसामुळे 3 बंगले घसरले; दोघांचा मृत्यू

लवासा सिटीतील 65 टक्के बंगल्यात कोणीही राहत नाही त्यामुळे हे बंगलेसुद्धा असेच कधीही कोसळू शकतात, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यात गुरुवारी पाऊस सुरू होता तेव्हा पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावरील लवासा सिटीमध्ये (Lavasa City) तीन दिवसांपूर्वी तीन बंगले कोसळले होते. लवासा सिटीकडे जाणारा पुणे-टेमघर-लवासा हा मार्ग गेल्या तीन दिवसांपासून बंद होता. त्यामुळे इथे रेस्क्यू ऑपरेशनसुद्धा करता येत नव्हतं. दरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आणखी काही लोक दबले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये वीजदुरुस्तीसाठी आलेली व्यक्ती आणि त्याचा मदतनीस यांचा समावेश असल्याची माहिती आहे. 

लवासा सिटीतील 65 टक्के बंगल्यात कोणीही राहत नाही त्यामुळे हे बंगलेसुद्धा असेच कधीही कोसळू शकतात, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. लवासात दरड कोसळलेल्या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. 

नक्की वाचा - शिळफाटा : पुजाऱ्यांनी बलात्कार अन् हत्या केलेल्या महिलेला न्याय मिळणार! मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

पुण्यात गुरुवारी जेव्हा पूर आला, त्याचवेळी आणखी एक दुर्घटना लवासामध्ये घडली होती. पावसाचा जोर आणि भूस्खलनामुळे लवासामधील तीन बंगले अख्खेच्या अख्खे घसरले होते. मातीच्या ढिगाऱ्याखाली बंगले गाडले गेले होते. लवासा सिटीकडे जाणारा पुणे टेमघर लवासा हा मार्ग गेले तीन दिवस बंद होता. त्यामुळे इथे बचावकार्यही नीट करता आलं नाही. पूर परिस्थितीनंतर लवासामध्ये भयानक विध्वंस घडलाय. या घडीलाही लवासा सिटीमध्ये अनेक लोक अडकून पडलेत. 

Advertisement

लवासाची सुरुवात कधी झाली?
शरद पवार ब्रिटनमध्ये असताना त्यांना लवासाची कल्पना सुचली. HCC चे MD अजित गुलाबचंद हे इटलीला गेले होते त्यांच्याही डोक्यात 1998 पासून हा विषय डोक्यात घोळत होता. 2000 साली लवासा मूर्त रूपात आली. टेमघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ही टाऊनशीप उभारण्यात आली. मात्र आवश्यक पर्यावरण परवानगी न घेतल्याने येथील बांधकामावर बंदी आणण्यात आली. त्यानंतर येथील घरांना घरघर लागली. सध्या येथील 65 टक्के बंगल्यात कुणीच राहत नाही. सह्याद्रीच्या डोंगर कपारीत असलेली ही घरं कधीही खाली घसरू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.