अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या (baba siddique news) हत्या प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Gang) बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून लॉरेन्स बिश्नोई गँगने आपण ही हत्या केल्याचं कबुल केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पोस्टमध्ये सलमान खानच्या (Salman Khan) नावाचाही उल्लेख आहे.
नक्की वाचा - एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक कोण आहेत? बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा करणार तपास!
शुबु लोणकर महाराष्ट्र या नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकीची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. या पोस्टमध्ये दिल्यानुसार...
ओम जय श्रीराम, जय भारत. जीवनाचं मूल जाणतो. शरीर आणि संपत्ती माझ्यासाठी धुळीसमान आहे. सलमान खान... आम्हाला हे युद्ध नको होतं, मात्र तुझ्यामुळे आमच्या भावाचं नुकसान झालं. आज ज्या प्रकारे बाबा सिद्दीकी यांच्या प्रामाणिकतेचे पूल बांधले जात आहेत, ते एकेकाळी दाऊदसह मकोका अॅक्टमध्ये होते. याच्या मृत्यूचं कारण अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डिलिंगशी जोडणं होतं.
आमची कोणाशी काहीही शत्रूत्व नाही, मात्र जो कोणी सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल त्याला आपल्या हिशोब तयार ठेवावा लागेल. आमच्या कोणत्याही भावाचा जीव घेतला, तर आम्ही प्रतिक्रिया देऊच. आम्ही सुरुवातीचा वार कधीच केला नाही. जय श्रीराम, जय भारत.. सलाम शहिदां नू...
कोण आहे शुभम लोणकर?
शुभम लोणकर याला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र पोलिसांनी अकोल्यातून अवैध शस्त्रांसह अटक केली होती. तपासात शुभम लोणकर याचं कनेक्शन लॉरेन्स बिश्नोई गँगसह असल्याचं समोर आलं होतं. या चौकशीत त्याने सांगितल्यानुसार, परदेशात असलेली लॉरेन्स बिश्नोई याच्या जवळची व्यक्ती अनमोल बिश्नोईसोबत तो संपर्कात होता. दोघे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत होते. त्यावेळी शुभम लोणकर याने तो व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लॉरेन्स गँगशी संपर्कात असल्याचं मान्य केलं होतं.