1 बिबट्या, 3 दिवस, 6 पथकं, 100 कर्मचारी, संभाजीनगरात दहशत

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांना घरा बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
संभाजीनगर:

गेल्या तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांना घरा बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. या बिबट्याची दहशत इतकी आहे की, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनीही त्याचा धसका घेतला आहे. शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याला पकडण्यासाठी आता शहरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. शिवाय एक गनमनलाही बोलवण्यात आले आहे. बिबट्याला जेरबंद करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एक बिबट्या संभाजीनगरात घुसला आहे. त्याला शहरातल्या वेगवेगळ्या भागात पाहीला गेला आहे. शहराचा मध्य भाग असलेल्या उल्कानगरी भागात हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर या भागात सर्च ऑपरेशन हाता घेण्यात आले. त्यासाठी सहा पथकं तयार करण्यात आली आहे. वन विभागाचे एकूण 100 कर्मचारी या मोहिमेत आहेत. एक पथक नाशिकवरून आले आहे. शिवाय गनमनचाही त्यात समावेश आहे. गेल्या तीन दिवसापासून बिबट्या वन विभागाच्या हाती लागलेला नाही. 

ट्रेंडिंग बातमी -  लाडका भाऊ योजनेत बहिणीला ही संधी, समोर आली नवी माहिती

हा बिबट्या बुधवारी रात्री शहरातील एका मॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा मॉल सिडको परिसरात आहे. या मॉलच्या परिसरात आता सर्च ऑपरेशन केले जात आहे. बिबट्यासाठी या भागात ट्रॅप लावण्यात आला आहे. दरम्यान बिबट्या सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. ज्या भागात हा बिबट्या दिसला त्या ठिकाणचे लोक घरा बाहेरही पडत नाहीत. बिबट्याच्या भिती मॉर्निंग वॉकला जाणेही अनेकांनी टाळले आहे. त्यामुळे या बिबट्याला वनविभाग कधी पकडणार असा प्रश्न संभाजीनगरकर विचारत आहेत.

Advertisement