जाहिरात

लाडका भाऊ योजनेत बहिणीला ही संधी, समोर आली नवी माहिती

ही योजना लाडका भाऊ असली तरी या योजने अंतर्गत मुलीही अर्ज करू शकतात. त्यांनाही अप्रेन्टिसशिप मिळू शकते असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

लाडका भाऊ योजनेत बहिणीला ही संधी, समोर आली नवी माहिती
मुंबई:

लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केली. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रूपये मिळणार आहेत. तर वर्षाला 18,000 हजार रूपये मिळतील. ही योजना जाहीर झाल्यानंतर लाडक्या बहीणीला 1500 रूपये देता मग लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ ही योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत  12 वी पास तरुणांना 6 दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना मिळतील. त्यासाठी त्यांना एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणा दरम्यान अनुभव आणि पगार अशा दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. मात्र ही योजना लाडका भाऊ असली तरी या योजने अंतर्गत मुलीही अर्ज करू शकतात. त्यांनाही अप्रेन्टिसशिप मिळू शकते असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही योजना फक्त भावांसाठी नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लाडका भाऊ योजना ही फक्त तरूणांसाठी नाही.  त्याचा लाभ मुली ही घेवू शकतात असे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे. ज्या मुली 12 वी, आयटीआय, पदवीधर असतील अशांना या योजनेचा लाभ मिळेल असेही त्यांनी सांगितले आहे. यासाठी सरकारच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्याचे उद्धाटन आज गुरूवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  'लाडकी बहीण'नंतर 'लाडका भाऊ' योजना, वाचा तुम्हाला कसे मिळणार महिना 10 हजार रुपये?

अर्ज भरताना तिन कॅटेगिरी करण्यात आल्या आहेत. त्यात 12 वी, आयटीआय आणि पदविधर याचा समावेश आहे. त्यानुसार कंपन्यांमध्ये या तरूणांना संधी दिली जाईल. सहा महिन्याचे प्रशिक्षण इथे दिले जाईल. या कालावधीत  12 वी पास तरुणांना 6 दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना मिळतील. ज्यांचे काम चांगले असेल त्यांना त्याच कंपनीत  कायमची नोकरीही मिळू शकते. 

( नक्की वाचा : 'लाडकी बहीण' योजनेच्या अटीमध्ये महत्त्वाचे बदल, अर्ज भरण्यापूर्वी वाचा सर्व माहिती )

राज्यात अनेक उद्योग येत आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षित तरूण तयार होणार आहेत. त्यामुळे राज्यात येणाऱ्या उद्योगांसाठी त्याचा फायदा होईल. शिवाय तरूणांना नोकऱ्याही मिळतील असा दावा मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे. शिवाय राज्यातल्या 10 लाख तरूणांना या योजनेचा फायदा होईल असेही त्यांनी सांगितले. ही योजना यशस्वी होईल. देशात या योजनेची कॉपी केली जाईल असेही ते म्हणाले. 

लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला?

12 वी उत्तीर्ण - दरमहा 6 हजार रुपये
डिप्लोमा झालेला तरुण - दरमहा 10 हजार रुपये
पदवीधर तरुण - दरमहा 10 हजार रुपये

'लाडका भाऊ योजने'साठी पात्रता काय?

- या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
- या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे
- शैक्षणिक पात्रतेचे 12 वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत
- शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही
- बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल
- अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com