जाहिरात

Girija Oak Godbole: 'नॅशनल क्रश' उपाधीआधी आयुष्य कसं होतं आणि नंतर कसं बदललं? गिरीजा ओक यांनी सगळच सांगितलं

"आयुष्य अजिबात बदललं नाही.सगळं तसच छान सुरु आहे. आधीही उत्तम सुरु होतं आणि आताही उत्तमच सुरु आहे.चार लोकांचं लक्ष आपल्याकडे आहे, याची जाणीव मात्र झाली"

Girija Oak Godbole: 'नॅशनल क्रश' उपाधीआधी आयुष्य कसं होतं आणि नंतर कसं बदललं? गिरीजा ओक यांनी सगळच सांगितलं
Girija Oak Godbole NDTV Interview

Girija Oak Godbole NDTV Interview : अनेक लाटा महाराष्ट्रासह देशाने पाहिल्या आहेत.एखाद्या नैसर्गिक आपत्तीची लाट येऊन जाते.एखाद्या नेत्याची लाट येऊन जाते.एखाद्या आजाराची लाट येऊन जाते.मागच्या वर्षी एका मुलाखतीची लाट आली होती. त्यानंतर तुला एका रात्रीत नॅशनल क्रश ही उपाधी मिळाली.त्याच्या आधी आयुष्य कसं होतं आणि नंतर आयुष्य कसं बदललं? यावर प्रतिक्रिया देताना गिरीजा ओक गोडबोले म्हणाल्या, "आयुष्य अजिबात बदललं नाही.सगळं तसच छान सुरु आहे. आधीही उत्तम सुरु होतं आणि आताही उत्तमच सुरु आहे.चार लोकांचं लक्ष आपल्याकडे आहे, याची जाणीव मात्र झाली.ती लाट यासाठीच असते की ती ओसरते एक दिवस.ती जशी येते तशी ती ओसरते सुद्धा.याची जाणीव असणं महत्त्वाचं असतं.ती जशी आली तशी ती ओसरली.तरीही सगळं छानच आहे".

"मला एका कास्टिंग डायरेक्टरने बघितलं.."

गिरीजा ओक गोडबोले पुढे म्हणाल्या, "मी अॅक्सीडेंटली जाहिरातीत काम करू लागले. मी आणि माझी आई एका नव्या जाहीरात प्रोडक्शनच्या ओपनिंगसाठी गेलो होतो.ज्यांची कंपनी होती, ते माझ्या आईचे ओळखीचे होते.तिथे मला एका कास्टिंग डायरेक्टरने बघितलं.तिथेच माझ्या आईला विचारलं की, तुमची मुलगी एका जाहीरातीसाठी ऑडिशन करेल का? तिथल्या तिथेच माझी एक छोटीशी स्क्रिनटेस्ट घेतली आणि ती जाहीरात मला मिळाली. त्यामुळे मुळात आम्ही ऑडिशनसाठी गेलोच नव्हतो.अचानकच ते घडलं आणि मी काही जाहीराती करत गेले.तुम्ही जाहीराती सगळ्या बघितल्या असतील,तर एक लहान मुलगा असतो आणि त्याची एक शहाणी मोठी बहीण असते.त्या मोठ्या बहिणीच्या वयोगटात मी इतकी फीट होत असे की तशा मला अचानक जाहीराती मिळत गेल्या आणि मी जाहीराती करू लागले". गिरीजा ओक 'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होत्या.

नक्की वाचा >> "आम्ही 1500 रुपये आता देतोय, पुढे 2100 रुपये देऊ,पण..", लाडकी बहीण योजनेबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान

"..तर ठामपणे नाही म्हणायला शिक"

"माझ्या वडिलांना या पहिल्या जाहीराती बद्दल माहितही नव्हतं. जेव्हा त्यांचा फोन आला की ही जाहीरात तू करणार आहेस..तेव्हा माझ्या आईने त्यांना सांगितलं की असं काहीतरी झालंय.त्यानंतर मला एका चित्रपटासाठी ऑडीशनचा कॉल आला.मराठी चित्रपट होता.रितसर ऑडिशन घेऊन ठरवलं की मला कास्ट करायचं.शूटिंगच्या पहिल्या दिवशी वडिलांनी मला बसवून हे सांगितलं होतं की,एकतर काही पटत नसेल किंवा आवडत नसेल, तर ठामपणे नाही म्हणायला शिक. या वयात सगळं खूप भारावून टाकणारं असतं.आपल्या आसपासचे वयाने अनुभवाने मोठे वाटतात.त्यामुळे पटकन सगळ्या गोष्टींना होकार दिला जातो.त्यानंतर आपल्याला कळतं की हे आपल्याला आवडत नाहीय करायला..त्यामुळे नाही म्हणायला शिक नीट आणि ठामपणे. मन दुखावू नको आणि ठामपणे नाही म्हणायला शिक, हे त्यांनी मला ठामपणे सांगितलं",असंही गिरीजा ओक गोडबोले म्हणाल्या.

नक्की वाचा >> IAS Manisha Mhaiskar: "मुलगी जेव्हा जन्मते,तेव्हा ती जन्मत: शक्ती असते",IAS मनिषा म्हैसकर यांचं मोठं विधान

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Girija Oak, Girija Oak Godbole, Girija Oak Godbole Family, गिरीजा ओक गोडबोले, गिरीजा ओक गोडबोले मुलाखत, गिरीजा ओक
Listen to the latest songs, only on JioSaavn.com